Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
प्रवासी वाढले, पण पीएमपी बसची संख्या काही वाढेना
Aapli Baatmi September 29, 2020

भोसरी : “राजगुरूनगर ते भोसरी असा दररोज पीएमपीने प्रवास करतो. मात्र, काही वेळेस बसमध्ये जागा मिळत नाही. एक बस गेल्यावर दुसरी बस दोन ते अडीच तासाने येते. त्यामुळे आलेली बस सोडता येत नाही. परिणामी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही,” अशी व्यथा प्रवासी चंद्रकांत बारणे यांनी व्यक्त केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनामुळे बंद असलेली पीएमपी बससेवा आता पूर्ववत झाली आहे. केवळ 25 टक्केच बस सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, याकरिता बसमध्ये 22 प्रवासी घेण्याची अट पीएमपीने घातली आहे. 3 सप्टेंबर रोजी पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून 325 बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या 81 हजार 162 होती. त्यात वाढ होऊन 25 सप्टेंबरपर्यंत एक लाख 54 हजार 21 वर गेली. प्रवाशांची संख्या दुप्पट झाली. मात्र, बसची संख्या 122 ने वाढविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामाला किंवा घरी जाण्याची घाई असल्याने आलेली बस पकडण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू होते. अधिक प्रवासी बसमध्ये भरल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे पीएमपीने जास्त गाड्या सोडव्यात, अशी मागणी होत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रवासी संजय चौधरी म्हणाले, “पीएमपी सुरुवातीच्या थांब्यावरच पूर्ण भरत असल्याने पुढील थांब्यावरील प्रवाशांना न घेताच पुढे जाते. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते.” बीआरटीएसचे वाहतूक नियंत्रक काळूराम लांडगे म्हणाले, “बसमध्ये 22 प्रवासी घेतल्यावर इतर प्रवासी घेणे बंद केले जाते. मात्र, प्रवासी बसमध्ये घेण्यासाठी वाहकाशी हुज्जत घालतात.”
समज देऊनही प्रवासी ऐकेनात
खडकी आणि वाकड येथे वाहतूक पोलिसांनी पीएमपी बस तपासली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी 22 पेक्षा अधिक प्रवाशांना पोलिसांनी खाली उतरवले. तसेच, बसचालक व वाहकांना समजही देण्यात आली. मात्र, तरी प्रवासी जबरदस्तीने बसमध्ये चढत आहेत, अशी माहिती एका वाहकाने दिली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रत्येक डेपोतून बसमार्गाप्रमाणे अहवाल मागविण्यात येणार आहे. ज्या मार्गावर प्रवासी संख्या अधिक असेल, त्या मार्गावर बसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. याविषयी निर्णय घेऊन वाढीव बस सुरू करण्यात येतील. दोन बसमधील वेळ एक तास ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
– राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023