Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
एसटीला प्रवासी अन् कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा...आर्थिक चाक अजूनही रूतलेच : दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित
Aapli Baatmi September 29, 2020

सांगली- कोरोना आपत्तीत राज्य परिवहन मंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. सध्या एसटी गाड्या सुरू झाल्या असल्या तरी बऱ्याच फेऱ्या तोट्यात सुरू आहेत. तशातच कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे एस.टी.ला प्रवाशांची तर कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा, असे चित्र आहे. एस.टी.चे आर्थिक चाक खोलवर रूतलेच आहे. त्याला शासनस्तरावरून धक्का देण्याची गरज निर्माण झाली आहे.
एस.टी.चा तोटा भरून काढण्यासाठी मार्च व एप्रिल महिन्यात “भारमान वाढवा’ अभियान सुरू करण्यात आले. परंतु अभियानच्या दुसऱ्या पंधरवड्यातच कोरोनामुळे हळूहळू फेऱ्या कमी करण्यात आल्या. तर 24 मार्चपासून लॉकडाउन जाहीर केल्यामुळे एस.टी.चे चाक जाग्यावर थांबले. जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या प्रांतात सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून कर्तव्य बजावले. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर सध्या पूर्ण क्षमतेने गाड्या धावत आहेत. परंतु कोरोनाच्या प्रभावामुळे अजूही प्रवासी संख्या म्हणावी तशी वाढलेली नाही.
त्यामुळे एस. टी गाड्या पूर्वीच्या तुलनेत केवळ 25 टक्के क्षमतेनेच धावत आहेत. जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य एस. टी. बसेस धावत असल्या तरी प्रवासी नसल्यामुळे फेऱ्या मर्यादितच आहेत. त्याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांना महिन्यातून जेमतेम आठवडाभरच काम मिळते, अशी स्थिती आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा कमी क्षमतेने धावणाऱ्या बसेसना प्रवाशांची, तर कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे. जुलै व ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्याप जमा झालेले नाही. अधिकाऱ्यांचे वेतन महिन्याच्या एक तर कर्मचाऱ्यांचे 7 तारखेला होते. परंतु दोन महिन्यांचे वेतन तिसरा महिना संपत आला तरी मिळालेले नाही.
कोरोना आपत्तीत मार्च महिन्यात 75 टक्के, एप्रिल महिन्यात शंभर टक्के, मे महिन्यात 50 टक्के, जून महिन्यात शंभर टक्के वेतन झाले. शासनाने केलेल्या मदतीमुळे मार्च व मे महिन्यातील उर्वरित वेतनही मिळाले. परंतु सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतनच मिळाले नाही. सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्याप वेतनाचा पत्ता नाही. एस.टी.च्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नातून दिले जाते. परंतु सध्या उत्पन्न कमी झाल्यामुळे आर्थिक चाक रूतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासनस्तरावरून मदतीचा हात मिळणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील चित्र
जिल्ह्यात सध्या 170 ते 175 गाड्या जिल्हा, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य मार्गावर धावतात. रोज 760 फेऱ्या होतात. तर 60 हजार किलोमीटर अंतर कापले जाते. त्यापासून 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. इतर वेळी 2 लाख 60 हजार किलोमीटर अंतर कापले जाते. तर उत्पन्न 60 लाखाहून अधिक मिळते. सध्याच्या पूर्वीच्या तुलनेत 25 टक्केच उत्पन्न मिळते अशी स्थिती आहे.
“”कोरोना आपत्तीत कर्तव्य बजावणाऱ्यांना प्रतिदिन 300 रुपयेप्रमाणे भत्ता मिळालेला नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या वारसांना मदत मिळाली नाही. तशातच जुलै आणि ऑगस्टचे वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे एस.टी. कर्मचारी अडचणीत आहेत. शासनस्तरावरून तातडीने आर्थिक मदत मिळाली पाहिजे.”
-अशोक खोत
विभागीय अध्यक्ष, एस. टी. कामगार संघटना
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023