Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
कोल्हापुरातील पहिलीच घटना ; बहिरेश्वरच्या लोकनियुक्त सरपंचाविरूद्ध अविश्वास ठराव मंजूर
Aapli Baatmi September 29, 2020

कसबा बीड – बहिरेश्वर (ता.करवीर) येथील लोकनियुक्त सरपंच साऊबाई नारायण बचाटे यांच्या विरूद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. तहसीलदार शीतल मुळे-भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत थेट जनतेतून निवडलेल्या सरपंच पदाविरूद्ध ठराव एक विरूद्ध दहा मतांनी ठराव मंजूर करण्यात आला. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
येथील उपसरपंचासह सदस्य युवराज दिंडे, तानाजी गोधडे, उत्तम चव्हाण, कृष्णात सुतार, रंजना संभाजी दिंडे, रंजना रामचंद्र दिंडे, मीनाक्षी गोसावी, योग्यता गोसावी व शालाबाई कांबळे यांनी सरपंच बचाटे या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात हे कारण दाखवत नवीन शासन निर्णयाच्या आधारावर करवीर तहसीलदार कार्यालयात तक्रार करत अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्याबाबत ग्रामपंचायत सदस्यांची आज बैठक आज तहसीलदार शितल मुळे-भामरे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन सरपंच शालाबाई बचाटे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी सर्कल तलाठी पुरूशोत्तम ठाकूर उपस्थित होते.
जुलै २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते सीताराम पाटील, सूर्यकांत दिंडे, भगवान दिंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीतून लोकनियुक्त सरपंच बचाटे यांच्यासह आघाडीची सत्ता आली होती. नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, ग्रामसेविका विमल पवार, प्रोबेशनल तलाठी स्वाती भोईर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सरपंचाचे नातेवाईकच ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करतात असा आरोप बैठकीत करण्यात आला. हा आरोप सरपंच बचाटे यांनी बैठकीत मान्य केला. यावेळी सर्व सदस्यांनी बोटे वर करून अविश्वासच्या बाजूने मतदान केले.
हे पण वाचा – मजुरांच्या तांड्याला मधमाशांनी घेरले ; साहित्य टाकून जीवाच्या आकांताने पळ
जिल्ह्यातील पहिली घटना
२०१७ च्या लोकनियुक्त सरपंच कायद्यानुसार सरपंचावर अविश्वास दाखल करताना पहिल्यांदा सर्व सदस्यांनी अविश्वास दाखवून ग्रामसभेत बहुमत सिद्ध करावे लागत होते. पण लोकनियुक्त सरपंच कायदा बदलल्या नंतर पुर्वी प्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांना अविश्वास ठरावावर सदस्यांना तहसीलदारांच्या उपस्थितीत मतदान करता येते. त्यानुसार आज अविश्वास ठराव बैठक झाली. लोकनियुक्त सरपंचाला पायउतार होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
संपादन – धनाजी सुर्वे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023