Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा; डॉ.भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Aapli Baatmi September 29, 2020

नाशिक : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले आहे.
नुकसानीचा आढावा घेतला
संसदेचे अधिवेशन आटोपून परतताच भ्रमणध्वनीवरून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नुकसानीचा डॉ. पवार यांनी आढावा घेतला. पुरामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांची घरे तसेच रस्ते पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत. शेतातील उभी पिके पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांसह शेत वाहून गेले आहे. शिवाय नुकसानीचे पंचनामे होत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या, असे डॉ. पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा > ‘रेमडेसिव्हिर’च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश
तत्काळ सरसकट नुकसानभरपाई
अगोदरच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जीवनमान विस्कळित झाले असताना निसर्गाने अवकृपा केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट नुकसानभरपाई मिळावी असे खासदार डॉ भारती पवार म्हणाल्या.
हेही वाचा > मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
संपादन – रो्हित कणसे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023