Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
नवीन दरवाढीच्या कराराशिवाय मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत : आमदार गोपीचंद पडळकर
Aapli Baatmi September 29, 2020

आटपाडी (जि. सांगली)- राज्यातील ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार आणि आणि मुकादम संघटनांचा करार संपला आहे. नवीन दरवाढीचा करार करण्याकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली नवीन दरवाढीचा करार मान्य होईपर्यंत राज्यातील ऊस तोडणी मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत. त्यांच्या वतीने संप करण्यात असल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी माहिती दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीमध्ये आमदार पडळकर यांनी गोपीनाथरावजी मुंडे ऊस तोड मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटना आणि महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊस तोडणीमधून संघटनेने पुकारलेल्या संपाची माहिती दिली. ते म्हणाले,””माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. मागण्यासाठी कवठेमंकाळ तालुक्यातील ढालगाव, जत तालुक्यातील संख, सांगोला तालुक्यातील कोळा आणि आटपाडी तालुक्यातील झरे येथे माजी मंत्री सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (30) बैठका आयोजित केल्या आहेत.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष पप्पू डोंगरे, ब्रह्मानंद पडळकर, तानाजी यमगर, विष्णू अर्जुन, हरिराम गायकवाड आदीं उपस्थिती होते.
या आहेत मागण्या…
दरवाढीचा नवीन करार मान्य होईपर्यंत ऊसतोडणी न करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. ऊस तोडणी वाहतूक दरात वाढ करावी, मुकादमच्या कमिशनमध्ये वाढ करावी, सर्व कारखान्यात शौचालय सुविधा असल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये, मजूर व बैलांचा संपूर्ण विमा कारखान्याने उतरावा या व अन्य मागण्यांसाठी करार होईपर्यंत संप केला जाणार आहे.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023