Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
इस्लामपूरातील मदरसात 70 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू
Aapli Baatmi September 29, 2020

इस्लामपूर : मुस्लिम समाजाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू केलेले कोविड केअर सेंटर सर्व समाजांचे आधार केंद्र बनेल, असा विश्वास राज्याचे जल संपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. समाज व शासनाच्या माध्यमातून उभा रहाणाऱ्या सोईसुविधामधून निश्चितपणे कोरोनाचा मृत्यूदर कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील ख्रिश्चन बंगला परिसरातील चॉंदतारा मदरसामध्ये मुस्लिम समाजाने सुरू केलेल्या 70 बेडच्या अद्यावत कोविड केअर सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. माजी नगरसेवक पिरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, उपनगराध्यक्ष दादासो पाटील उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले,””कोविडच्या वाढत्या संख्येमुळे सरकारने केलेल्या व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. या स्थितीत समाजाने पुढे येऊन काही सुविधा उभा करणे कौतुकास्पद आहे. सध्या हॉस्पिटलची बिले ऐकून रुग्ण हॉस्पिटलमध्ये जात नाही, हा आपला पराभव आहे. कोरोना कोणालाही होऊ शकतो. त्याचे कायम भान ठेवत सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा व हात धुवा. माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रमात सहभागी होवून शहर, गाव “शून्य रुग्ण’ संख्येवर आणा.”
मुनिर पटवेकर, अजहर जमादार, अल्ताफ मोमीन यांची भाषणे झाली. सेंटरचे प्रणेते पिरअली पुणेकर, मुबारक ईबुशे, डॉ. फरिदूद्दीन आत्तार, डॉ. मोहसीन मुजावर यांचा श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, डॉ. नरसिंह देशमुख, अरविंद माळी, ऍड. चिमण डांगे, विजय पाटील, संजय पाटील, खंडेराव जाधव, हाफिज जावेद, रफीक पठाण, शकील जमादार, आयुब हवलदार, बशीर मुल्ला, ऍड. मिनाज मिर्झा, जावेद ईबुशे, मासुम गणीभई, हिदायतुल्ला जमादार, जलाल मुल्ला, आबीद मोमीन, अश्पाक पुणेकर, नियाज बीजपुरे, राजू जमादार, अबुबकर मकानदार, इस्माईल पुणेकर, इम्रान डंगरे, अजहर मोमीन, सैफ अली, रमिझ दिवाण, एजाज मणेर उपस्थित होते.
हॉस्पिटल गुरुवारी सेवेत
70 बेडच्या हॉस्पिटलमध्ये पाच आयसीयु बेड आहेत. एक्सरेसह सर्व बेडना ऑक्सिजन सुविधा आहे. मलेशियावरून दोन ड्युरा सिलेंडर मागवली आहेत. गुरुवारपासून हॉस्पिटल सेवेत राहणार असल्याचे पिरअली पुणेकर यांनी सांगितले.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023