Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
कोरोनाने अडचणीत भर ; गगनाला गेले दर, कसे बांधावे घर
Aapli Baatmi September 30, 2020

परभणी ः ‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ या म्हणीप्रमाणे लग्न करणे सोपे, परंतू, घर बांधणे मात्र दिवसेंदिवस अवघड झाले आहे. कोरोना संसर्गामुळे सलग तीन ते चार महिणे बांधकाम बंद होते. परंतू, आता त्याला परवानगी देण्यात आली असली तरी साहित्याचे दरही वाढले आहेत. वाळूचा भाव आठ ते नऊ हजार ब्रास, तर सिमेंटची गोणी ३०० रुपये आणि लोखंडाचे भाव ४० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्नही आता स्वप्नच ठरू लागले आहे.
परभणी शहरात मागील काही वर्षांत घर बांधकामाचा व्यवसाय चांगलाच तेजीत आला. ग्रामीण भागातील लोकांचा ओढा शहराकडे वाढत असल्यामुळे शहर झपाट्याने वाढू-विस्तारत लागले. प्रत्येकाला हक्काचे छोटेसे का होईना घर असावे असे वाटते. त्यामुळे प्लॉटची खरेदी-विक्री सुरू झाली.
घर घेणे आवाक्याच्या बाहेर गेले
जमिनीचे व्यवहार करणारे आणि बांधकाम व्यावसायिकांनी जास्तीचा नफा कमावण्याच्या हव्यासात प्लॉटच्या आणि जमिनींच्या पलट्या करीत भाव गगनाला भिडवले. प्लॉटचे दर ही वाढले आहेत. शहराच्या जवळ एक किलोमीटपर्यंत जवळपास २० लाख व त्यापेक्षा जास्त अंतरावर १५ ते १७ लाख असे भाव आहेत. ग्रामीण भागातील व सध्या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न लक्षात घेता घर घेणे आवाक्याच्या बाहेर गेले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून छोटासा प्लॉट घेऊन घर बांधण्याकडे लोकांचा कल वाढला.
हेही वाचा – टेबल वर्कच्या कामामुळे वसुली लिपीकांना भरली धडकी
सिमेंटची गोणी तीनशेच्या घरात
कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्या तरी घर बांधण्यावर लोकांचा भर राहिला, मात्र आता असे घर बांधणेही कठीण झाले आहे. बांधकाम मिस्त्रीला ६०० रुपयांपर्यंत, तर इतर मजूर महिलांना तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. बांधकामाचे लोखंड ४० रुपये किलोपर्यंत गेले असून, सिमेंटची गोणी तीनशेच्या घरात आहे.
हेही वाचा – परभणीतील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला दंडाची शिक्षा
म्हणावे तसे काम मिळत नाही
गेल्या चार महिण्यापासून लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे आधीच कामे नाहीत. त्यात साहित्याचे भाव वधारल्याने अनेकांनी घरे बांधकाम थांबविले आहे. काही जणांनी घर बांधण्याचा प्लॅन पुढे ढकलला आहे. त्यामुळे मिस्त्री लोकांना म्हणावे तसे काम मिळत नाही.
– शेख हाफीज शेख हुसेन, कंत्राटदार, परभणी
संपादन ः राजन मंगरुळकर
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023