Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
ऑनलाईन शिक्षणासाठी 'प्रेम' चा संघर्ष, महिनाभर शेतात राबराब राबून घेतला फोन.
Aapli Baatmi September 30, 2020

उमरगा : सध्या शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. पण, ग्रामीण भागातील अनेक गरजू कुटुंबातील मुलांकडे पैशाअभावी स्मार्टफोन नाहीत. त्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षणात अडचण येत आहेत. अशाच एका गरजू कुटुंबातील मुलाने ऑनलाइन शिक्षणासाठी महिनाभर शेतमजुरी केली. त्यातून मिळालेल्या पैशातून त्याने स्मार्टफोन घेतला. आता तो ऑनलाइन धडे घेत आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
तालुक्यातील बेटजवळगा येथील प्रेम दत्तू गायकवाड हा आठवीत शिकतो. शिक्षणाची प्रचंड आवड असलेल्या प्रेमच्या घरची परिस्थिती जेमतेमच. कुटुंबीयांकडे अडीच एकर कोरडवाहू जमीन. उत्पन्नही जेमतेमच. त्यावर कुटुंबाचा खर्च शक्य नसल्याने दत्तू गायकवाड पत्नी व मुलासह शेतातील मजुरीचे कामे करतात. सहा मुलींपैकी चार मुलींचे विवाह झाले. प्रेम हा एकुलता मुलगा. गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने गुंजोटीच्या श्रीकृष्ण विद्यालयात तो शिकतो. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. परंतु, प्रेमला मोबाईल घेणे शक्य होत नव्हते.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
त्याने घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आई-वडिलांसोबत शेतात मजुरीच्या कामाला जाण्याचा निर्णय घेतला. महिनाभरात काम करून त्याने मोबाईलसाठी रक्कम जमा केली आणि नऊ हजारांचा मोबाईल दोन दिवसांपूर्वी खरेदी केला. अजूनही तो शेतात सोयाबीनच्या काढणी कामासाठी जातो. उसंत मिळाल्यावर ऑनलाइनचा अभ्यास करत आहे. भूमिपुत्र नीलेश गायकवाड यांच्याप्रमाणे त्यालाही आयएएस अधिकारी व्हायचे आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
शिक्षणामुळे जीवनात परिवर्तन होते. आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी शिक्षणासाठी संघर्ष महत्त्वाचा असतो, असे गुरुजी नेहमी सांगतात. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल खरेदी करणे शक्य होत नव्हते. शेतात मजुरीचे काम करून मोबाईल घेतला आणि ऑनलाइन अभ्यास सुरू केला आहे.
– प्रेम गायकवाड, विद्यार्थी.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023