Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
रक्ताच्या नात्यानेच केला घात; मुली, जावयाकडूनच आई-वडिलांच्या घरावर डल्ला
Aapli Baatmi September 30, 2020

नाशिक रोड : पैशासाठी काही नाती एवढ्या खालच्या थराला जातात की त्याचा अंदाजही लावता येत नाही. इथे तर रक्ताच्या मुली आणि जावयांकडूनच आई-बाबांच्या घरावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
चक्क आई-बाबांच्या घरीच मारला डल्ला आसाराम घुले (रा. श्रीराम बंगला, लवटे मळा, जय भवानी रोड, नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे घर बंद असताना बनावट चावी लावून त्यांच्या दोन्ही मुली शैलजा पोटे, मीरा दहिफळे, नातू पवन पोटे, जावई वसंत पोटे या चौघांनी बनावट चावी वापरून दरवाजा उघडला. घरातील कपाटातून दोन लाख ५० हजार रुपये, चार लाख ५० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व चांदीचे देव असा सुमारे सात लाख ६० हजारांचा ऐवज १ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर या कालावधीत चोरून नेला.
हेही वाचा > मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
पोलिसांत चार जणांविरुद्ध तक्रार दाखल
मुली, जावई, नातवंडे यांनी घरावर डल्ला मारून सुमारे साडेसात लाखांचे दागिने व रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. उपनगर पोलिसांत चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली.
हेही वाचा > ‘रेमडेसिव्हिर’च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023