Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
भागवताचार्य वा. ना. उत्पात यांच्या अस्थींचे चंद्रभागा नदीत विसर्जन
Aapli Baatmi September 30, 2020

पंढरपूर (सोलापूर) : प्रसिद्ध भागवताचार्य, हिंदुत्ववादी विचारवंत वा. ना. उत्पात यांच्या अस्थींचे हरिनामाचा जयघोष करत अत्यंत भावपूर्ण वातावरणात चंद्रभागेत विसर्जन करण्यात आले. या वेळी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील शेकडो पंढरपूरकरांनी चंद्रभागेच्या तीरी गर्दी केली होती.
कट्टर सावरकरभक्त, विचारवंत, निर्भीड वक्ते अशी ओळख असलेल्या वा. ना. उत्पात यांचे पुण्यातील हॉस्पिटलमध्ये सोमवारी उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा अस्थिकलश पंढरपूर येथे आणण्यात आला होता. मंगळवारी दिवसभर त्यांच्या निवासस्थानी आणि सावरकर वाचनालयामध्ये अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
आज (बुधवारी) सकाळी साडेआठ वाजता कै. उत्पात यांच्या श्री विठ्ठल मंदिराजवळील निवासस्थानाजवळ चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले यांच्यासह अनेक महाराज मंडळी, वारकरी, फडकरी यांच्या उपस्थितीत हरिनामाचा जयघोष करण्यात आला. तेथून श्री विठ्ठल मंदिराला वळसा घालून महाद्वार घाटावरून अस्थिकलश चंद्रभागा वाळवंटात भक्तराज श्री पुंडलिक मंदिराजवळ आणण्यात आला. या वेळी वारकरी परंपरेप्रमाणे अभंग म्हणण्यात आले. त्यानंतर कै. उत्पात यांचे पुत्र, माजी नगरसेवक ऋषीकेश उत्पात, पुतणे गणेश उत्पात यांनी शोकाकूल वातावरणात चंद्रभागेत अस्थींचे विसर्जन केले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023