Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
देशी अंडी 10, पोल्ट्री अंडी 7 रूपये; चिकन महागले
Aapli Baatmi September 30, 2020

पेड : ग्रामीण भागात अंडी, चिकनचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुकानात पोल्ट्रीच्या एका अंड्याचा दर 7 रुपयांच्या आसपास आहे. तर देशी कोंबडीचे अंड्याचा तुटवडा निर्माण झाला असून 10 रुपये देऊन सुद्धा अंडे मिळेनाशी झाले आहे. त्याचबरोबर चिकनचा दर 200 रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आता अंडी, चिकन खाणे आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे त्यांच्या आहारातून अंडी, चिकन, मटण गायब होण्याच्या मार्गावर आहे.
अंडी, चिकन यांच्या सेवनामुळे आपल्याला प्रोटीन्स मिळतात. त्यातून आपली रोग प्रतिकारशक्ती वाढू शकते असे सांगितले जाते. त्यामुळे मटण, चिकन व अंड्याच्या मागणीत कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील मार्च – एप्रिल महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालल आहे लोकांच्यात एक प्रकारची कोरोना विषयी भीती निर्माण झाली आहे. त्यावर प्राथमिक उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात मटण, मासे, चिकन व अंड्यांचा वापर आहारात केला जात आहे. मात्र मागील आठवड्याभरापासून अचानक अंडी व चिकनच्या दरात वाढ झाली आहे.
त्यांच्या किंमती कोणत्या कारणामुळे वाढल्या असा प्रश्न सर्वसामान्य, गोरगरीब लोकांना पडला आहे. मागील 15 ते 20 दिवसापूर्वी 5 रुपयांना मिळणारे पोल्ट्रीची अंडे आता 7 रुपयांना मिळू लागले आहे. तर देशी अंड्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याची किंमत 10 रुपये झाली असून ते सुद्धा देशी मिळेनाशी झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चिकनला मोठी मागणी वाढल्याने चिकनचे दर 150 रुपये वरुन तब्बल 200 ते 220 रुपये प्रतिकिलो झाला आहे. मागील पाच महिन्यात चिकन व अंड्याचे दर वाढले नाहीत. मात्र या पाच दहा दिवसात एकदम दरात वाढ कशी झाली असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
देशी अंड्याचा तुटवडा…
ग्रामीण भागात शेती बरोबरच घरगुती देशी कोंबड्याचे पालन केले जाते. मात्र कोरोना मुळे देशी अंड्याना मोठी मागणी आहे. कोंबड्यांची संख्या कमी असल्याने आणि लोकांना घरगुती खाण्याइतकीच अंडी उपलब्ध होत असल्याने मागणी असून सुद्धा त्याची विक्री केली जात नाही. देशी अंड्याना 10 रुपये दर देऊन सुद्धा अंडी मिळेनाशी झाली आहेत. परिणामी लोकांना पोल्ट्रीच्या अंड्याकडे वळावे लागत आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023