Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
साखर कारखान्यांकडून यंदा इथेनॉलचे मुबलक उत्पादन
Aapli Baatmi September 30, 2020

पुणे – राज्यात साखर कारखान्यांकडून यंदा दहा लाख टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन टाळून इथेनॉलचे उत्पादन घेण्यात येणार आहे. त्यामुळे साखरेचे दर स्थिर राहतील. त्यातून कारखान्यांना ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर देणे शक्य होईल. तसेच, इथेनॉलच्या मिश्रणामुळे भविष्यात पेट्रोलचे दरही कमी होण्यास मदत होणार आहे.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यात येत्या हंगामात ७३ साखर कारखान्यांकडून १०८ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच, पुढील हंगामासाठी १९ सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी परवानगी दिलेली आहे. राज्यात गतवर्षी सुमारे १८ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाले होते. राज्यात येत्या हंगामात ८७३ लाख टन ऊस गाळप होईल. तसेच, सुमारे ११० लाख टन साखरेचे उत्पादन होईल. परंतु, इथेनॉलमुळे साखरेचे उत्पादन दहा लाख टनांनी घटून शंभर लाख टनांवर येईल. दरवर्षी राज्यात ३६ लाख टन साखरेचा खप होतो. तर, ६० लाख टन साखरेची निर्यात केली जाते. राज्यात ऑगस्ट २०२० अखेर ६४.३६ लाख टन साखरेचा साठा शिल्लक आहे. याशिवाय या हंगामात आणखी शंभर लाख टन साखरेचे उत्पादन होणार आहे.
थकहमीनंतरही 12 कारखान्यांनाच गाळप परवाना ! 188 कारखान्यांनी केले अर्ज
इथेनॉलला मागणी, पण पुरवठा कमी
मोलॅसिस (उसाची मळी) सोबतच आता साखरेचा सिरप आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रणास परवानगी आहे. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून इथेनॉलला भरपूर मागणी आहे. परंतु, त्या क्षमतेनुसार पुरवठा होत नाही.
रेस्टॉरंट, बार उघडण्यास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय
पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८८ ते ९० रुपये आहे. तर, इथेनॉलचा दर ४५ ते ५५ रुपये आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे दहा टक्के मिश्रण केल्यास पेट्रोलचे दर काही प्रमाणात कमी होतील. त्याचा लाभ वाहनचालकांना होणार आहे. परंतु, त्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
– बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, नॅचरल शुगर कारखाना
इथेनॉलचे उत्पादन वाढल्यामुळे कारखान्यांना ऊस उत्पादकांना वेळेवर एफआरपी देणे शक्य होईल. पेट्रोलच्या दरात लगेच फारसा फरक पडणार नाही. परंतु, भविष्यात पेट्रोलियम कंपन्यांकडून पंपावर इथेनॉलमिश्रणाच्या प्रमाणानुसार पेट्रोल विविध दरात उपलब्ध होईल.
– शेखर गायकवाड, साखर आयुक्त
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023