Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
विरोध असेल तर मिरज हायस्कूलच्या जागेचा ठराव खंडित करू : उपमहापौर आनंदा देवमाने
Aapli Baatmi September 30, 2020

मिरज (जि . सांगली) : मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणाची जागा व्यापाऱ्यांना देताना हायस्कूलच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होणार असेल, तर आपण स्वतः याबाबतचा ठराव खंडित करू, असे आश्वासन उपमहापौर आनंद देवमाने यांनी मिरज हायस्कूल बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळास आज दिले.
याबाबत मिरज हायस्कूल बचाव कृती समितीच्या सदस्यांनी दिलेली माहिती अशी, उपमहापौर देवमाने हे एका बैठकीसाठी महापालिकेच्या मिरज कार्यालयात आले असता कृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन त्यांना हा ठराव खंडित करण्याची विनंती केली. यावेळी उपमहापौर देवमाने यांनी आपण हा ठराव महापालिकेचे आर्थिक हित साधण्यासाठी सभेसमोर आणला. परंतु त्यामुळे हायस्कूलच्या अस्तित्वास बाधा येत असेल, तर आपण स्वतः हा ठराव खंडित करू. अद्याप या ठरावाचे इतिवृत्त लिहिलेले नाही, असेही महापौर देवमाने यांनी स्पष्ट केले.
अण्णाबुवा शॉपिग सेंटरमधील दुकानधारकांना मिरज हायस्कूलच्या क्रिडांगणाची जागा देण्याच्या ठरावाचा विषय मिरज हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या उपमहापौर आनंदा देवमाने यांनी आयत्या वेळचा विषय म्हणून घाईगडबडीत मंजूर करून घेतला.
या ठरावाविरोधात मिरजेतील सामाजिक संघटना व माजी विद्यार्थ्यांनी मिरज हायस्कूल बचाव कृती समितीची स्थापना केली आणि महापालिकाविरोधात लढा उभारला. याबाबत आज (ता. 29) भेटलेल्या शिष्ट मंडळात ऍड. ए. ए. काझी, तानाजी रुईकर, जावेद पटेल, मुस्तफा बुजरुक, संतोष माने, डॉ. प्रशांत लोखंडे, असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, बाळासाहेब पाटील यांचा समावेश होता.
ठराव रद्द होईपर्यंत लढा सुरुच
मिरज विभागीय कार्यालयात उपमहापौर आनंदा देवमाने यांच्या भेटीवेळी ठराव खंडित करण्याबाबत सविस्तर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठराव रद्द करण्याची मागणी ठामपणे केली. शिवाय हा ठराव रद्द होईपर्यंत हा लढा सुरुच राहणार असल्याचेही स्पष्ट केले.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023