Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
सर्पदंश झाल्यापासून महिलेवर तब्बल तेरा तासानंतर उपचार
Aapli Baatmi September 30, 2020

राजापूर – तालुक्यातील अणसुरे येथील संर्पदश झालेल्या महिलेवर जैतापूर-राजापूर-रत्नागिरी-डेरवण असा प्रवास केल्यानंतर तब्बल सुमारे तेरा तासानंतर उपचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये सुदैवाने ती महिला बरी झाली आहे. मात्र आरोग्य विभागाचा कारभार आणि त्या ठिकाणच्या उपलब्ध आरोग्य सुविधांबाबत लोकांमधून साशंकता आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने भातकापणीच्या कामांना सुरवात झाली आहे. या कालावधीत लोकांना संर्पदंश, विंचूदंश यांचा सामना करावा लागत आहे. अशातच अणसुरे येथील एका महिलेला सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी घडली.
हे पण वाचा – माजी आमदारांचा भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश
तिच्या नातेवाइकांनी त्या महिलेला तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथून त्या महिलेला राजापूरला हलविण्यात आले. राजापूरहून रत्नागिरी आणि त्यानंतर तिला डेरवण येथे उपचारासाठी हलविण्यात आले. यामध्ये तब्बल सुमारे तेरा तासांचा प्रवास घडला. या प्रवासानंतर तिच्यावर उपचार झाले. सुदैवाने ती महिला सुखरूप आहे.
संपादन – धनाजी सुर्वे
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treatment thirteen hours after the bite in ratnagiri
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023