Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
संजीव धुरंधर यांचा सन्मान; अमेरिकन फिजिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड
Aapli Baatmi September 30, 2020

पुणे – अमेरिकन फिजिकल सोसायटीने (एपीएस) भौतिकशास्त्रामधील अतुलनीय योगदानाबद्दल प्रा. संजीव धुरंधर यांची फेलो (मानद सदस्य) म्हणून निवड केली आहे. गुरुत्त्वीय भौतिकशास्त्र विभागाने केलेल्या शिफारशींनुसार प्रतिनिधी मंडळाने सप्टेंबरच्या बैठकीमध्ये ही घोषणा केली. प्रा. धुरंधर यांची विज्ञानातील आणि विशेषतः भौतिकशास्त्रामधील सर्वोत्तम कामगिरीचा हा सन्मान आहे. भारतात राहून कार्यरत असणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी हा एक दुर्मिळ आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
असे आहे सन्मानपत्र –
गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी आवश्यक भक्कम सैद्धांतिक पायाभरणी, विशेषतः विदा (डेटा) विश्लेषणाच्या पद्धतीसाठी, तसेच भारतात गुरुत्वीय लहरींबद्दल संशोधन पुढे नेऊन लायगो-इंडियाच्या स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल प्रा. धुरंधर यांना हा बहुमान देण्यात येत आहे.
चारित्र्याचा संशय; नव्या नवरीने तीन महिन्यांतच केली आत्महत्या
प्रा. धुरंधर यांचे संशोधन महत्त्वपूर्ण का?
अल्बर्ट आइन्स्टाईनने 1916 मध्ये गुरूत्वीय बलाशी निगडित सापेक्षता वादाचा सिद्धांत मांडला. तारे, ग्रह, कृष्णविवरे आदी वस्तुमान असलेल्या घटकांमुळे अवकाश दबले (वक्र) जाते. (उदा. गादीवर लोखंडी चेंडू टाकल्यास ती दबली जाते आणि गादीवर पडलेली वस्तू चेंडूकडे घरंगळत जाते. यालाच आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो.) यामुळे अवकाश (स्पेस) आणि वेळ (टाइम) ही वक्र होते. जेव्हा असे प्रचंड वस्तुमान एकमेकांना धडकतात तेंव्हा त्यातून गुरुत्वीय लहरी तयार होतात. अवकाश आणि वेळेच्या माध्यमातून त्या प्रवास करतात. आइन्स्टाईनच हा सिद्धांत प्रत्यक्ष प्रयोगातून (लायगो)सिद्ध करण्याचे काम प्रा. धुरंधर यांचा सहभाग असलेल्या संशोधकांच्या एका गटाने केले.
अमरावतीच्या नगररचना विभागाच्या सहसंचालकांच्या पत्नीला अटक; बिल्डरची फसवणूक
नक्की योगदान काय?
1980-90 च्या काळात प्रा. धुरंधर यांनी आयुकामध्ये गुरुत्वीय लहरींवर संशोधन सुरू केले. गुरुत्त्वीय लहरी खरोखरीच सापडतील असं खूप कमी लोकांना वाटायचं. प्रा. धुरंधर यांनी डॉ. सत्यप्रकाश आणि अनेक संशोधक विद्यार्थ्यांना सोबत घेत भारतातील गुरुत्त्वीय लहरींबद्दल पहिला संशोधनगट तयार केला. त्यांची गणिती पद्धत (मॅचड फिल्टरिंग) लायगो संशोधन समूहाने 2015 मध्ये गुरुत्त्वीय लहरींचे सर्वप्रथम मापन करण्यासाठी वापरली आणि अद्यापही ही पद्धत वापरली जाते.
आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास
भारतातील गुरुत्त्वीय लहरींसंबंधित जवळपास सर्वच महत्त्वाच्या घडामोडींच्या मुळाशी प्रा. धुरंधर यांचा आणि बंगळूरमधील प्रा. बाला अय्यर यांचा संबंध आहे. धुरंधर यांच्या भारतीय विज्ञान आणि गुरुत्त्वीय लहरी संबंधित योगदानाची योग्य दखल आता घेतली जात आहे.
– प्रा. शोमक रायचौधरी, आयुकाचे संचालक
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023