Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
बापरे...जिल्ह्यात केवळ आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा
Aapli Baatmi October 01, 2020

सांगली- जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये केवळ 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील गरजू रूग्णांना सुरळीत व वेळेवर रक्त मिळण्याकरिता नागरिकांनी पुढे यावे. गरजू रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
ते म्हणाले, “”जिल्ह्यात दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबर या काळात कॉलेजेस् व कंपन्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे होतात. परंतु यंदा कोरोना प्रार्दुभावामुळे कॉलेजेस् बंद आहेत व कंपन्या सुरू असून रक्तदान शिबीरे घेण्याची अनुकूलता नाही. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम होत नसल्याने विविध सामाजिक संस्थाकडून होणारे उपक्रम होऊ शकले नाहीत. याचा रक्त संकलनावर परिणाम झाल्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. रक्तदानासाठी सद्या कोणी पुढे येत नसल्याने रक्तपेढ्यांची स्थिती गंभीर झाली आहे.
थॅलेसिमिया, हिमोफिलीया, निमिया रूग्णांबरोबरच गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया, गरोदरमाता प्रसुती शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रूग्ण यांना रक्ताची गरज भासत आहे. अपेक्षित रक्त संकलन होत नसल्याने मागणी व पुरवठा यातील समतोल बिघडू लागला आहे. या करीता जिल्ह्यातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. सध्या जिल्ह्यातील 2 शासकीय व 16 खासगी अशा एकूण 18 रक्तपेढ्या आहेत. रक्तपेढ्यांकडे 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असून गरजू रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करावे. शासकीय रक्तपेढ्यांत गरजू रूग्णांकरीता रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे.”
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only eight days of blood supply in the district
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023