Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
औरंगाबादेतील रस्त्याच्या निधीबाबत मंत्रालयातील अधिकारी म्हणतात, ‘कशात काहीच नाही’ !
Aapli Baatmi October 01, 2020

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी शासनाने महापालिकेला १५२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मात्र अद्याप निधीचे पत्र मिळाले नसल्यामुळे महापालिका व रस्ते विकास महामंडळाच्या हिश्श्याची रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. पत्रासंदर्भात महापालिकेचा पाठपुरावा सुरू असून, मंत्र्यालयातील अधिकारी मात्र ‘अजून कशात काहीत नाही… थांबा थोडे’ असे उत्तर देत आहेत.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शहरातील १५२ कोटींच्या निधीतून महापालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसी कामे करणार आहे. ‘एमआयडीसी़’ने पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार कामे सुरू केली आहेत. पण महापालिका व ‘एमएसआरडीसी’ला निधीबाबतच्या पत्राची प्रतीक्षा आहे. निधी उपलब्धतेचे पत्र शासनाकडून मिळावे, यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा केला जात आहे; परंतु शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
महापालिकेतील अधिकाऱ्याने निधीबद्दलची विचारणा करण्यासाठी बुधवारी (ता. ३०) मंत्रालयात अधिकाऱ्याला फोन केला असता, ‘अजून कशातच काही नाही, जरा थांबा’ असे उत्तर देण्यात आले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या बैठकीत निधीवरून पालकमंत्र्यांनी ‘निधीच्या पत्राचे तुम्ही मला आता सांगताय का?’ असे म्हणत अधिकाऱ्यांना सुनावले होते.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023