Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
कारमालकाला झाडाला बांधून लुटले, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार
Aapli Baatmi October 01, 2020

उस्मानाबाद : तुळजापूर-औसा महामार्गावर कारमालकाला झाडाला बांधून गोळ्या घालण्याची धमकी देत लुटल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. त्यानंतर कार पळवून नेण्यात आली. हा प्रकार बुधवारी (ता. तीस) पहाटे अडीच्या सुमारास घडला.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
लक्ष्मण सोनकांबळे (रा. वाकडी, जि. रायगड) असे कारचालकाचे नाव असून, त्यांच्याजवळील मोबाइल आणि रोकडही लुटारूंनी लंपास केली. लक्ष्मण सोनकांबळे पहाटेच्या सुमारास त्यांच्या हुंदाई कारमधून (एमएच ०४, एफएफ ५९१) औशावरून तुळजापूरच्या दिशेने जात होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
टोलनाक्यापासून वीस किलोमीटरवर आले असता, पाच दरोडेखोरांनी त्यांना कार बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखविण्यात आला. ‘‘आवाज करू नको, नाहीतर गोळी घालेन, तुझ्याजवळचे सर्व पैसे आमच्याकडे दे,’’ असे धमकावले. यावेळी लुटारूंनी त्यांच्याजवळील दोन मोबाइल व आठ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांना त्यांच्याच गाडीत बसवून आणल्यानंतर नळदूर्ग रोडवरील चिंचेच्या झाडाला बांधले. त्यानंतर हुंदाई कार घेऊन दरोडेखोर पसार झाले. या प्रकरणी सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023