Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
कोरोना योद्ध्यांच्या थकित वेतनासाठी आरोग्यमंत्र्यांकडे मागणी !
Aapli Baatmi October 01, 2020

अंबाजोगाई (बीड) : परिसरातील लोखंडी सावरगाव येथे जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील सर्वात मोठे असणारे कोविड रुग्णालय उभारले. मात्र, येथील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे वेतन वर्षापासून थकलेले आहे. यासाठी भाजप युवा नेते अक्षय मुंदडा सरसावले असून त्यांनी या प्रश्नावर मंगळवारी (ता. २९) राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
श्री. टोपे यांनी लातूर परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक व संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना करुन वेतन तातडीने अदा करण्याचे आदेश दिले आहेत. वेतनासाठी या कोरोना योद्ध्यांनी गुरुवार (ता. एक) पासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला हेाता. तात्कालिन आरोग्यमंत्री कै. डॉ. विमलताई मुंदडा यांनी आपल्या कार्यकालात लोखंडी सावरगाव येथे मानसरुग्ण व वृध्दत्व रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय मंजूर केले. गेली दहा वर्ष त्याची इमारत बांधून धुळखात पडलेली होती. मागील वर्षी सप्टेंबर (२०१९) या रुग्णालयातील ११ डॉक्टर्स, ११ परिचारिकांच्या जागा भरण्यात आल्या होत्या, परंतू हे कार्यरत न झाल्याने नविन नियुक्ती केलेले डॉक्टर व परिचारीकांची इतरत्र प्रतिनियुक्ती करण्यात आली होती.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मागील महिन्यात शासनाने याच ठिकाणी ८०० खाटांचे कोवीड केअर सेंटर सुरू केल्यानंतर इतर ठिकाणी प्रतिनियुक्ती केलेले डॉक्टर्स व परिचारिका पूर्ववत येथे कार्यरत झाले. एकिकडे मराठवाड्यातील सर्वात मोठे कोविड सेंटर व हॉस्पीटल असलेल्या येथील कोरेाना योद्धे वेतनापासून वंचित होते. नियुक्ती झाल्यापासून या डॉक्टरांना व परिचारिकांना पगारच दिला गेला नाही. विना वेतन ते काम करत होते.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कोवीडची जबाबदारी सांभाळत अद्याप ते काम करतच आहेत. मात्र अर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने अखेर कंटाळून त्यांनी ता.१ ऑक्टोबरपासून पगाराच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयातील कोविड केअर सेंटर सुरू आहे. त्यात सध्या २५० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. अगोदरच तिथे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्षय मुंदडा यांनी ही समस्या व प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मांडला, तसे लेखी निवेदनही दिले. आरोग्य मंत्र्यांनी ही समस्या लक्षात घेऊन संबंधित विभागास तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. आता यानंतरही किती दिवसात हा प्रश्न मार्गी लागतो याकडे सर्वांचे लक्ष राहाणार आहे.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023