Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
तीन महिन्यांपासून वेतन मिळेना ! 'एसटी'चे कर्मचारी 9 ऑक्टोबरपासून करणार उपोषण
Aapli Baatmi October 01, 2020

सोलापूर : कोरोनाची भिती घेऊन कुटूंबाची पर्वा न करता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. तरीही त्यांना जुलैपासून पगार मिळालेला नाही. आता 7 ऑक्टोबरपर्यंत वेतन द्यावे, अन्यथा 9 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असे पत्र महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने परिवहन मंत्र्यांना दिले आहे.
ठळक बाबी….
- जुलैपासून महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही
- 7 ऑक्टोबरपर्यंत वेतन देण्याची कर्मचारी संघटनांनी केली विनंती
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही मिळाले नाही अर्थसहाय
- जीव धोक्यात घालून काम करुनही वेतन मिळत नसल्याने कर्मचारी आक्रमक
- 9 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर करणार उपोषण
वेतन कायद्यानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दरमहा वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य सरकारकडून निधी तथा अर्थसहाय मिळाल्यानंतर वेतन केले जाईल. निधी नसल्याने वेतन मिळेल, असे वारंवार सांगितले जात आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करुनही निधी मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे घराचे हप्ते, बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी उसनवारी करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिन्याचे वेतन तत्काळ मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हणुमंत ताटे यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी आठ दिवसांत पूर्ण न केल्यास राज्यभर उपोषण केले जाईल, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बहूतांश कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही चालक, वाहक प्रवाशांची सेवा करीत आहेत. अडचणीतील लालपरी सुस्थितीत यावी या हेतूने कोरोना काळातही कर्मचारी काम करीत आहेत. मात्र, महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन मिळत नसल्याने हे पाऊल उचलल्याचे श्री. शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I haven’t received salary for three months! ST workers will go on hunger strike from October 9
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023