Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
हेलिकॉप्टर उड्डाणाचा सराव लष्करीहद्दीत करावा; महापौरांसह खासदार गोडसे यांची मागणी
Aapli Baatmi October 01, 2020

नाशिक : लष्कराच्या गांधीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरचा सैनिकांकडून सराव करताना गांधीनगरसह जेल रोडच्या भागापर्यंत उड्डाण केले जात असल्याने हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे लष्करी हद्दीमध्येच सराव करावा, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह खासदार हेमंत गोडसे यांनी बुधवारी (ता. ३०) स्टेशन कमांडट यांची भेट घेऊन केली.
महापौरांसह खासदार गोडसे यांची मागणी
देवळाली लष्करी क्षेत्रातील गांधीनगर भागात हवाई दलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. गांधीनगर मिलिटरी विमानतळावरून सैनिकांना उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाते. सकाळी हेलिकॉप्टर शहराच्या विविध भागात आकाशातून उड्डाण करतात. त्यातल्या त्यात गांधीनगर महापौरांचे निवासस्थान असलेल्या डीजीपीनगर, वडाळागाव, उपनगर, जेल रोडपर्यंत उड्डाण होते. अनेकदा जमिनीपासून कमी अंतरावर हेलिकॉप्टर येत असल्याने आवाजाचा अनेकांना त्रास होतो. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होतो. दुपारी आणि रात्रीच्या वेळीदेखील हा सराव सुरू असतो.
हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा
त्यामुळे अपघातही होण्याची शक्यता
हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे वाहनचालकांचेही लक्ष विचलित होते. त्यामुळे अपघातही होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरी वस्तीत होणारा हा सराव लष्कराच्या हद्दीतच करावा, अशी मागणी महापौर कुलकर्णी, खासदार गोडसे, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी स्टेशन कमांडट गिवारी यांच्याकडे केली. गिवारी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून देण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023