Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
शिक्रापूरकरांच्या सेवेसाठी कोवीड अॅंब्यूलन्स दाखल
Aapli Baatmi October 01, 2020

शिक्रापूर : शिक्रापूरकरांच्या वैद्यकीय सेवेसाठी ग्रामपंचायतीचे वतीने पहिली स्वनिधीतील अॅंब्यूलन्स आज शिक्रापूरकरांच्या सेवेसाठी दाखल झाली. माजी उपसरपंच सागर सायकर यांच्या हस्ते अॅंब्यूलन्स लोकार्पण आज करण्यात झाले.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोवीड काळात स्थानिक पातळीवर रुग्ण वाहतूक करण्यासाठी अॅंब्यूलन्स घ्यावी म्हणून शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता राऊत यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायत बैठकीत निर्णय घेवून तसा निर्णय जिल्हा परिषदेला कळविण्यात आला होता. त्यानुसार १४ लाख २२ हजार रुपयांचा १४व्या वित्त आयोगाचा निधी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला वर्ग करुन सदर अॅंब्यूलन्स नुकतीच ग्रामपंचायतीकडे वर्ग करुन ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आल्याची माहिती सरपंच हेमलता राऊत यांनी दिली.
आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास
त्यानुसार सदर अॅंब्यूलन्सचे हस्तांतरण आणि लोकार्पण आज (ता. १) सकाळीच माजी उपसरपंच सागर सायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच रामभाऊ सासवडे, नवनाथ सासवडे, दत्ता राऊत आनंदराव हजारे, दत्ता गिलबीले, दिलीप कोठावळे, राजेंद्र करंजे, विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दरम्यान, अॅंब्यूलन्ससाठी शिक्रापूर ग्रामपंचायतीकडून १४ लाख २२ हजार रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. गोरे यांनी दिली व त्यानुसार अॅंब्यूलन्स शिक्रापूरकरांच्या सेवेत दाखल होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023