Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
एसटी कामगार संघटनेचा एल्गार...प्रलंबित वेतनासाठी सात ऑक्टोबरची डेडलाईन
Aapli Baatmi October 01, 2020

सांगली- कोरोना आपत्तीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना जुलै व ऑगस्टचे वेतन मिळाले नाही. या दोन महिन्यांसह सप्टेंबरचे वेतन 7 ऑक्टोबरपर्यंत न मिळाल्यास 9 रोजी राज्यभर आत्मक्लेश उपोषण केले जाणार आहे. सांगलीत देखील आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती विभागीय अध्यक्ष अशोक खोत व विभागीय सचिव नारायण सूर्यवंशी यांनी दिली.
कोरोना आपत्तीत एस. टी. कामगारांनी जिवाची बाजी लावून काम केले. कोरोनामुळे काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. धोका पत्करून प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी कर्मचारी काम करीत आहेत. परंतू त्यांना तीन-तीन महिने वेतन मिळत नसल्यामुळे ते हवालदील झालेत. उपासमारीमुळे काहींना अन्यत्र रोजंदारीवर जाण्याची वेळ आली आहे. वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक आहे. परंतू निधी नसल्याचे कारण सांगून राज्य सरकारकडे मदत मागितली आहे. परंतू वेतनासाठी मदत मिळेनाशी झाली आहे.
एस. टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री तसेच प्रशासनाशी वेळावेळी पत्रव्यवहार करून, प्रत्यक्ष भेटून विनंती केली आहे. मात्र वेतन मिळण्यास विलंब होत आहे. सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. तसेच सप्टेंबरच्या वेतनाची तारीखही जवळ आली आहे. त्यामुळे सात तारखेपर्यंत दोन महिन्याचे प्रलंबित वेतन आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळाले पाहिजे. तीन महिन्याचे एकत्रित वेतन न मिळाल्यास नऊ सप्टेंबर रोजी संघटनेच्यावतीने राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करण्याचा निर्णय श्री. ताटे व श्री. शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार सांगलीत देखील नऊ सप्टेंबर रोजी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती श्री. खोत व श्री. सूर्यवंशी यांनी दिली.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elgar of ST workers union. October 7 deadline for pending wages
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023