Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
"एमपीएससी'ची 11 ऑक्टोबरलाच परीक्षा ! आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने परीक्षा रद्दसाठी मंगळवारी "मातोश्री'समोर आंदोलन
Aapli Baatmi October 01, 2020

सोलापूर : राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून सद्य:स्थितीत राज्यभरात कोरोना बाधितांची संख्या 14 लाखांपर्यंत झाली आहे. दुसरीकडे मृतांची संख्या 37 हजारांवर पोचली आहे. तरीही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा वेळापत्रकानुसारच होईल, असे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रेही वितरित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दोनवेळा पुढे ढकलली होती. तर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुणे विभाग वगळता अन्य विभागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी दिली होती. त्याला विरोध करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या नजीकचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी मागितली. मात्र, आयोगाने ती मागणी पूर्ण केली नाही. त्यानुसार अडीच लाख विद्यार्थ्यांपैकी अवघ्या नऊ हजार जणांनीच परीक्षा केंद्र बदलले. आता राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर या जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग तथा प्रादुर्भाव वाढला आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटत असून आरक्षणाचा निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात सापडले आहे. यापूर्वी निवड झालेल्यांनाही नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र, यापूर्वी तीनवेळा परीक्षा पुढे ढकलली असून आता पुन्हा वेळापत्रकात बदल करणे शक्य नसल्याचेही आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
परीक्षा वेळापत्रकानुसारच होईल
आयोगाने यापूर्वीच “एमपीएससी’च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसह कम्बाईन आणि अभियांत्रिकी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 11 ऑक्टोबर रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रेही वितरित करण्यात आली आहेत. त्यामुळे परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्याचे नियोजन आहे.
– हणमंत आवताडे, सहसचिव, एमपीएससी, मुंबई
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023