Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
उस्मानाबाद कोरोना : १३३ पॉझिटिव्ह, १४९ झाले बरे !
Aapli Baatmi October 01, 2020

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गुरुवारी एकुण १३३ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच १४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर ३.९ टक्के इतका वाढला आहे. मृत्युदराप्रमाणेच रिकव्हरी रेट देखील वाढत असुन ७७.४७ टक्क्यावर पोहचला आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जिल्ह्यामध्ये १३३ रुग्णांमध्ये १४ जण आरटीपीसीआर तर १०९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील रुग्णांची संख्या अजूनही वाढतच असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यामध्ये पुन्हा ३७ रुग्णांची वाढ झाली आहे. यात ३१ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तीन जणांचे आरटीपीसीआरद्वारे अहवाल पॉझिटिव्ह आले. शिवाय तीन जणांना इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाची लागण झाली आहे. वाशी तालुक्यात ३४ रुग्णांची वाढ झाली असुन त्यामध्ये २९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर चार जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. एक जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाल्याची नोंद आहे. परंड्यामध्ये २०, भुम मध्ये १४, कळंबमध्ये १७, तुळजापुर सात व उमरगा चार अशी तालुकानिहाय रुग्णसंख्या वाढली आहे. लोहारा तालुक्यामध्ये गुरुवारी एकही रुग्ण सापडला नसल्याने दिलासादायक वातावरण आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पाच जणांचा मृत्यू
तुळजापुर शहरातील ७५ वर्षीय महिलेचा तेथील उपजिल्हा रुग्णालय येथे मृत्यु झाला आहे. परंडा तालुक्यातील वाकडी गावच्या ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालय येथे मृत्यु झाला आहे. भुम शहरातील ८० वर्षीय स्त्रीचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील पवारवाडी येथील ५५ वर्षीय स्त्रीचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद शहरातील मारवाड गल्ली येथील ७५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. एकुण मृत्युची संख्या आता ३८० वर पोहचली आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
उस्मानाबाद कोरोना मीटर
- एकुण रुग्णसंख्या – १२३०५
- बरे झालेले रुग्ण- ९५३३
- उपचाराखालील रुग्ण- २३९२
- एकुण मृत्यु – ३८०
- आजचे बाधित – १३३
- आजचे मृत्यु – ०५
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023