Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
हिंगोली : १७ लाख रुपये किमंतीचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Aapli Baatmi October 01, 2020

हिंगोली : हिंगोली ते वाशीम मार्गावर बासंबा पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ता. एक सकाळी साडेअकराच्या सुमारास एका टेम्पोतून आरजे कंपनीच्या गुटख्याची ११० पोते जप्त केले असून या गुटख्याची किंमत १७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी टेम्पो व गुटखा जप्त केला असून दोघांची चौकशी सुरु केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्हयातील कारंजा येथून एका टेम्पोमध्ये गुटख्याची वाहतुक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदिश भंडारवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, हवालदार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, आशिष उंबरकर, विलास सोनवणे, राजू ठाकूर यांच्यासह पथकाने वाशीम येथून येणाऱ्या वाहनांची तपासणी सरु केली होती.
हेही वाचा – नांदेड : ग्रामसेवकाने केला साडेचार लाखाचा अपहार, चौकशीची मागणी –
मका असलेल्या पोत्यामधे गुटख्याची पोते
सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान, पोलिसांनी टेम्पो (एमएच४८ जे ०९०४) थांबवून चालक शेख बबलू रा. अर्धापुर जि. नांदेड याची चौकशी सुरु केली. त्याने चौकशीमध्ये टेम्पोत मकाचे पोते असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी टेम्पो थेट पोलिस अधिक्षक कार्यालयात आणून तपासणी केली. यामध्ये मका असलेल्या पोत्यामधे गुटख्याची पोते आढळून आले.
आरजे नावाचा ११० पोते गुटखा
यामध्ये आरजे नावाचा ११० पोते गुटखा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चालक शेख बबलू व शेख जाकेर दोघे रा . अर्धापूर, जि नांदेड यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. सदरील गुटख्याची पोते कारंजा नांदेडकडे नेण्यात येत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
संपादन – प्रल्हाद कांबळे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023