Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना लोकशाहीला काळीमा फासणारी - छगन भुजबळ
Aapli Baatmi October 01, 2020

नाशिक : उत्तरप्रदेशातील हाथरस येथील मुलीवर सामूहिक बलात्कार करून जीवे मारून टाकण्यात आले. या मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना तिचे अंत्यदर्शन घेऊ न देता पोलिसांनी रात्रीतून अंत्यसंस्कार केले. या कुटुंबियांच्या भेटीसाठी काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी व प्रियंका गांधी गेले असताना त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटना लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या आहेत, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले.
पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, की देशातील मोठ्या नेत्याला अशी वागणूक मिळते, याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच कुठल्याही नेत्याला अशी वागणूक देणे ही बाब निषेधार्ह्य आहे. महाराष्ट्रात काही नसताना महाराष्ट्राच्या पोलिसांना बदनाम केले जाते आणि उत्तर प्रदेशात काय नेमकं काय घडतंय? देशातील जनतेने त्याचा निषेध करायला हवा.
हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा
नाशिकमध्ये आज निदर्शने
उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ संविधान प्रेमी नाशिककरांतर्फे शुक्रवारी (ता. २) सायंकाळी पाचला ईदगाह मैदानावर निदर्शने करण्यात येतील. बलात्कार आणि खूनाचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असून अंत्यसंस्कारात सहभागी होऊ दिले नाही हे मोठे षडयंत्र आहे. त्याचा निषेध केला जाणार आहे, असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा
संपादन – रोहित कणसे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023