Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बहीण सातारा ग्रामीणच्या उपअधीक्षक
Aapli Baatmi October 02, 2020

सातारा : गृहविभागाच्या आदेशानुसार सातारा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या दोन पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दोघांची बदली करतानाच सातारा पोलिस दलात चार नवीन अधिकारी दाखल होत आहेत. यामध्ये आंचल दलाल यांचा समावेश असून, त्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या भगिनी आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. गृहविभागाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. वरिष्ठ स्तरावरील बदल्या झाल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली होती. या प्रक्रियेनुसार सातारा जिल्हा पोलिस दलात असणाऱ्या कऱ्हाडचे उपअधीक्षक सूरज गुरव यांची तसेच वाईचे उपअधीक्षक अजित टिके यांची बदली झाली. त्यांची बदली करत असताना रिक्त उपअधीक्षकांच्या जागी गृहविभागाने नव्याने नेमणुका जाहीर केल्या.
..अखेर शिपाई झाला मुख्याधिकारी; निवृत्तीचा दिवस ठरला अविस्मरणीय!
यानुसार कोरेगाव उपविभागाचा कार्यभार गणेश रामचंद्र किंद्रे यांच्याकडे, तर वाई उपविभागाचा कार्यभार शीतल जाणवे-खराडे यांच्याकडे सोपवला आहे. दहिवडी उपविभागाचा कार्यभार नीलेश देशमुख यांच्याकडे, तर सातारा ग्रामीण विभागाचा कार्यभार आंचल दलाल यांच्याकडे सोपविण्यात आला. किंद्रे हे औरंगाबाद दहशतवादविरोधी पथकात, जाणवे या तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे, तर दलाल या पुणे ग्रामीण प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होत्या. दलाल या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या भगिनी आहेत.
आली रे आली.. कऱ्हाड नंतर नागपूरच्या गुंडांची बारी आली!
तीन-चार फुलांच्या गटांमध्ये आढळते ब्रम्हकमळ : खोकला, सर्दी, कॅन्सरवर आहे गुणकारी
Edited By : Siddharth Latkar
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023