Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
आजपासून इम्युनिटी बुस्टर पंधरवडा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Aapli Baatmi October 02, 2020

अकोला: नागरिकांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवून जीवघेण्या कोरोना आजाराचा मुकाबला करणे शक्य होणार आहे. याकरिता स्वतः जिल्हधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. अकोला जिल्ह्यात शुक्रवार (२ ऑक्टोबरपासून) इम्युनिटी बुस्टर पंधरवडा राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.
रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या संबंधीच्या घडीपत्रिकेचे वितरण घरोघरी केले जाणार आहे.
ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांनी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मुख्यमंत्री यांची मोहीम असून, या मोहिमेत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी सहभाग घेवून संदिग्ध रुग्ण व कोमाब्रीड रुग्णांची १०० टक्के तपासणी होईल, यासाठी लक्ष घालावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची माहिती १०० टक्के अॅपव्दारे ऑनलाईन भरावी, अशा सूचना त्यांनी दिल्यात.
होमक्वॉरंटाईन रुग्ण बाहेर फिरताना आढळल्याच्या तक्रारी येत आहे. यासाठी अशा रुग्णांवर लक्ष ठेवावे. बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मृत्यू पावलेल्या कुटूंबातील व्यक्तींची आणि आजूबाजूच्या कुटुंबांची कोरोना तपासणी करुन घ्यावी. अंत्यविधीस येणाऱ्यांचा डाटा ठेवावा. शहराजवळील गावात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तेथे कोरोना तपासणी शिबीर घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023