Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
लस निवडणुकीपूर्वी नाहीच; मॉडर्नाचा ट्रम्पना धक्का
Aapli Baatmi October 02, 2020

वॉशिंग्टन – आगामी अध्यक्षीय निवडणूकीपूर्वी कोरोनावरील लस बाजारात आणण्याचे आणि इतकेच नव्हे तर ती टोचण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न फोल ठरण्याची शक्यता आहे. तीन नोव्हेंबरपूर्वी लस तयार नसेल असे मॉडर्ना कंपनीने स्पष्ट केले. त्यामुळे ट्रम्प यांच्या साऱ्या आशा फायझर कंपनीवर असतील.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रचाराला चालना मिळावी म्हणून लस संशोधनाचे काम युद्ध पातळीवर सुरू ठेवण्यात आले आहे. तीन नोव्हेंबरपूर्वी लस तयार असेल असे ट्रम्प यांनी वेळोवेळी सूचित केले आहे. मॉडर्ना ही अमेरिकी कंपनी असून लशीच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.
COVID 19 Vaccine – अमेरिकेच्या मॉडर्नाने दिली खूशखबर; कोरोनावर लस ठरतेय प्रभावी
दरम्यान, फायझर ही कंपनी सुद्धा संभाव्य लस बनवीत असून ऑक्टोबरअखेर सुरक्षितता आणि परिणामकारकतेची आकडेवारी मिळालेली असेल असे सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या बाजूने अनुकूलता निर्माण करीत असल्याची शक्यता मात्र या कंपनीचे सीइओ अल्बर्ट बौर्ला यांनी फेटाळून लावली.
ट्रम्प यांनी पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षपद सोडायला नकार दिला तर काय?
फायझरचे सूतोवाच
दरम्यान, फायझर ही कंपनी सुद्धा संभाव्य लस बनवीत असून ऑक्टोबरअखेर सुरक्षितता आणि परिणामकारकतेची आकडेवारी मिळालेली असेल असे सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या बाजूने अनुकूलता निर्माण करीत असल्याची शक्यता मात्र या कंपनीचे सीईओ अल्बर्ट बौर्ला यांनी फेटाळून लावली.
लशीच्या सुरक्षिततेबाबत पुरेशी आकडेवारी २५ नोव्हेंबरपर्यंत मिळाल्यावर अन्न आणि औषध पाठविली जाईल. त्यानंतरच आणीबाणीच्या वापरासाठी मान्यता दिली जाईल.
– स्टीफन बॅन्सेल, मॉडर्नाचे सीईओ
माझ्यादृष्टीने निवडणुकीची तारीख हा कृत्रिम दिवस आहे. ऑक्टोबरची अखेर ही सुद्धा कृत्रिम बाब आहे. आम्ही त्याआधी लस आणू शकलो, तर ती आणू. आमची कार्यपद्धती अशी आहे.
– स्टीफन बौर्ला, फायझरचे सीइओ
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023