Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
खासगी नोकरवर्ग सर्वाधिक ताण-तणावात
Aapli Baatmi October 02, 2020

पुणे – ‘सकाळ सोबत बोलूया’ या हेल्पलाइनवर गेल्या दोन महिन्यात राज्यभरातून सुमारे तीन हजारहून अधिक लोकांनी विविध मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी मुक्त संवाद साधला.
तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांनी फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत, त्यांचे योग्य समुपदेशन व मार्गदर्शन केले. या हेल्पलाइनमुळे लोकांना व्यक्त होण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ही हेल्पलाइन मानसिक ताण – तणाव व समस्येचा सामना करणाऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने we are in this together या मोहिमेअंतर्गत व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने आणि कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअँबीलीटीजच्या सहकार्याने मानसिक ताण – तणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही चोवीस तास मोफत हेल्पलाइन तीन ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली. त्याला आज दोन महिने पूर्ण झाले.
पीएमपी प्रवाशांचा दिलासा लांबला; ‘डेली पास’चा निर्णय होणार पुढच्या बैठकीत
राज्यभरातून हेल्पलाईनवर फोन करणाऱ्यांमध्ये ६७ टक्के लोक शहरी भागातील होते. २०. २ टक्के लोक निमशहरी भागातील होते. १२. ७ टक्के लोक ग्रामीण भागातील होते. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई आदी मेट्रो शहरी भागातून येणारे कॉल्स सर्वाधिक असले तरी, नगर, शिरूर, जुन्नर, चाकण, बार्शी, लातूर, उस्मानाबाद, बारामती तसेच उरुळीकांचन, शिरवळ, गडहिंग्लज, भिगवणप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कॉल्सचेही प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे.
हेल्पलाईनवर मदतीसाठी फोन करणाऱ्या तीन हजार लोकांमध्ये खासगी नोकरदार वर्गाचे प्रमाण पहिल्या क्रमांकावर आहे.
मराठा आरक्षणाविषयी पुण्यात ‘विचार मंथन’; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी!
त्याखालोखाल गृहिणींचे प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच व्यावसायिक, विद्यार्थी, बेरोजगार व्यक्ती व शेतकरी या वर्गांचे मदतीसाठी फोन करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. येणाऱ्या कॉल्सच्या समस्यांमध्ये ताण- तणाव, भविष्याबद्दल काळजी, भीती आणि विशेषतः कोरोनाशी संबंधित शारीरिक, मानसिक ताणांच्याच्या बरोबरीने आर्थिक ताण, व्यवसाय-धंदे, नोकरीची चिंता आणि नातेसंबंधाशी संबंधित प्रश्नांचा प्रामुख्याने समावेश होता.
समाजातील अनेक लोकांना चिंता, काळजी, नैराश्य या गोष्टींनी ग्रासलेले असते. काही लोक यावर यशस्वी मात करून, नवीन उभारी घेतात. पण काहींना यावर मात करता येत नाही आणि आलेल्या नैराश्यापोटी ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. काही लोक प्रतिष्ठेपायी स्वतःहून पुढे येत नाहीत पण त्यांना समुपदेशन व मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अशा वेळी त्यांची ओळख अबाधित ठेवून, समुपदेशन व मार्गदर्शन केले तर लोक नैराश्यातून बाहेर पडतील व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. हा उद्देश समोर ठेवून प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.
हेल्पलाईनवरील समुपदेशक खरंच खूप चांगलं काम करत आहेत, याची प्रचिती रोजच्या ओपीडीमध्ये सुद्धा येत आहे. हेल्पलाइन सुरू झाल्यापसून लोक मानसिक ताणाबद्दल जास्त मोकळेपणाने बोलत आहेत व आवश्यकतेनुसार योग्य औषधोपचार घेण्यास तयार आहेत. हा बदल खूप महत्त्वाचा आहे.
– डॉ. योगेश पोकळे, मनोविकारतज्ञ, पुणे
एका कॉलरशी बोलताना असे जाणवले की, त्यांना त्यांच्या जन्मगावी जाण्याचा ध्यास लागला होता. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांची साथ त्यांना नव्हती. मी त्यांना समजावून सांगितले, की महत्त्वाचा निर्णय घेताना संपूर्ण कुटुंबाच्या सल्ल्याने व एकमताने घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्यांनी खूप समाधानाने फोन ठेवला. हेच समाधान आम्हाला प्रोत्साहन देणारे आहे.
– डॉ. मेधा कुमठेकर, मानसोपचारतज्ज्ञ
लोकांना त्यांच्या समस्येवर उत्तर हवंय किंवा त्यावर त्वरित रामबाण उपाय हवा आहे असे नाही. पण त्यांना आपले कोणीतरी ऐकणारे हवे आहे, एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा लोक नातेवाइकांशी, मित्रांशी बोलतात, तेव्हा ‘तुझंच काहीतरी चुकलं असेल, तू तुझं वर्तन सुधार’ असे सल्ले दिले जातात. हेल्पलाईनवर मात्र आम्ही असे सल्ले देणे टाळतो. आम्ही त्यांना मोकळेपणाने बोलू देतो, त्यांचं ऐकून घेतो.
– वीरेन राजपूत, समुपदेशक
हेल्पलाइन २४ तास सुरळीत सुरू ठेवण्यामागे ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व कर्वे समाजसेवा या दोन्ही संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये विविध समुपदेशकांचा, मनोविकार व मानसोपचार तज्ज्ञांचा समन्वय साधणे, कार्यशाळांचे आयोजन करणे, तंत्रज्ञानाच्या साह्याने योग्य निष्कर्ष काढणे आणि त्यानुसार पुढील ध्येय – धोरणे ठरवणे आदींचा समावेश होतो. या सर्व बाबी मानसिक स्वास्थ्य क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी अतिशय महत्त्वाचे दुवे ठरू शकतात.
– डॉ. महेश ठाकूर, प्रभारी संचालक, कर्वे समाजसेवा संस्था, पुणे
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023