Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पावसाच्या विश्रांतीनंतर उजनी धरणाचे दरवाजे बंद
Aapli Baatmi October 02, 2020

इंदापूर- उजनी धरणाच्या दरवाज्यातून सांडव्यामार्गे भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रियागुरूवार दि. १ ऑक्टोबर पासून बंद करण्यात आली आहे. यंदा हा प्रकल्प भरल्यापासून महिना भरात ३०.९८ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्याच्या लाभक्षेत्रातील धरणकार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उजनीधरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असून दौंड येथे २७१७ तर बंडगार्डन येथे २१८७ क्युसेक विसर्ग आहे. उजनी धरण १०९.११ टक्के भरले असून धरणाचे दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
उजनीतून वीज निर्मितीसाठी १६०० क्युसेक पाणी सोडले जात होते, ते ही सायंकाळी बंद करण्यात आले आहे. आता दहिगाव योजनेसाठी १०५, आष्टी ७०, कारंबा ८०, शिरापूर ७०, बोगदा १००, मुख्य कालवा ९०० क्युसेक असे पाणी सोडले जात आहे.
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस उजनी धरण १०० टक्के भरले होते. त्यानंतर ते सप्टेंबर मध्ये ११० टक्के झाले. धरणाची पाणी साठवण क्षमता संपल्यानंतर प्रकल्पातून भीमा नदीत पाणी सोडणे सुरू होते.धरणात मागील काही दिवस पुणे जिल्हा लाभ क्षेत्रात १७ धरणे १०० टक्के भरल्याने प्रकल्पातून सोडलेले व पावसामुळे पाणी येत होते. मात्र आता आवक अत्यंत कमी झाल्याने उजनीचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
उजनी धरणाची आजची पाणी पातळी ४९७.२३५ मीटर असून धरणात १२२.१२ टीएमसी पाणी साठले आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५८.४५ टीएमसी आहे.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023