Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
नवयुवकांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये : उदयनराजे भोसले
Aapli Baatmi October 02, 2020

सातारा : महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सातारा जिल्ह्यात तर मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने ठिकठिकाणी आंदाेलन, माेर्चा, विद्यार्थी परिषदा हाेत आहेत. दरम्यान राज्यातील मराठा समाजातील युवक अस्वस्थ झाले असून बीड जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त करुन राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी आत्महत्या यासारखे पाऊल उचलू नये असे आवाहन केले आहे.
उदयनराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ पाहणारा बीड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील मराठा तरुण विवेक कल्याण राहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली त्यांना आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत.”
आली रे आली.. कऱ्हाड नंतर नागपूरच्या गुंडांची बारी आली!
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ पाहणारा बीड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील मराठा तरुण विवेक कल्याण रहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली त्यांना आमच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या परिवारा सोबत आमच्या संवेदना आहेत. pic.twitter.com/YcCMi3Ee2r— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) October 1, 2020
उदयनराजेंच्या आरक्षण रद्द करा भुमिकेमुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटणार ?
याचबरोबर, राहाडे परिवारासाठी ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. समाजातील नवयुवकांना आमचे आवाहन असेल. राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी असे पाऊल उचलणे हे राष्ट्राच्या व समाजाच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे, असा धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही आणि यातून काही निष्पन्न होणार नाही, असेही राजेंनी नमूद केले आहे.
रहाडे परिवारासाठी ही कधीही न भरून निघणारी हानी आहे.
समाजातील नवयुवकांना आमचे आवाहन असेल.
राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी असे पाऊल उचलणे हे राष्ट्राच्या व समाजाच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे. असा धीर सोडून व टोकाचा निर्णय घेउन चालणार नाही आणि यातून काही निष्पन्न होणार नाही.— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) October 1, 2020
सातारकरांनाे.. माझे कुटुंब माझी जबाबदारी स्पर्धेत सहभागी व्हा अन् बक्षीस मिळवा
याशिवाय, मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र व भावनिक आहेत हे मान्य आहे. त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. आजची परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, तरी न्यायालयात मोठ्या ताकदीने आपण लढा देत आहोत. त्यामुळे विजय निश्चित आपला होईल, असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र व भावनिक आहेत हे मान्य आहे त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही.
आजची परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली तरी न्यायालयात मोठ्या ताकदीने आपण लढा देत आहोत त्यामुळे विजय निश्चित आपला होईल.— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) October 1, 2020
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023