Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
निर्भयाची वकील लढवणार हाथरस पीडितेची केस; पण...
Aapli Baatmi October 02, 2020

लखनौ (उत्तर प्रदेश): देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयात पीडितेची बाजू मांडणाऱ्या विधीज्ञ सीमा कुशवाहा या हाथरस बलात्कार पीडितेचा खटला लढणार आहेत. त्यासाठी त्या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. पण, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू दिले नाही.
पोलिसांनी आमचे ब्लाउज ओढलेः ममता ठाकूर
सीमा कुशवाहा म्हणाल्या, ‘पीडितेच्या कुटुबियांनीच मला त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडण्याची विनंती केली आहे. परंतु, येथील प्रशासन मला पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही. पीडित युवतीच्या भावाच्या संपर्कात असून, त्यांच्या कुटुबियांना भेटल्याशिवाय परतणार नाही.’ सीमा कुशवाहा यांनी निर्भया बलात्कार खटल्यात निर्भयाच्या कुटुंबाची बाजू न्यायालयासमोर मांडली होती. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या वर्षी 20 मार्च रोजी चारही आरोपींना फाशी देण्यात आली. सीमा कुशवाहा आता हाथरसमधील बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात बाजू मांडणार आहेत. पण, उत्तर प्रदेशमधील प्रशसन त्यांना पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही.
Video: ‘योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कधीही गाडी पलटी होते’
दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात राहणारी युवती 14 सप्टेंबर रोजी शेतात काम करत होती. यावेळी चार जणांनी तिला खेचत बाजूला नेले आणि अत्याचार केला. युवतीच्या पाठीचा मणका मोडला. शिवाय, बोलता येऊ नये म्हणून जीभ कापली. यानंतर ओढणीने गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तिला शेतात सोडून पळून गेले. आई आणि भावाने शोधाशोध केल्यावर ती शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यनंतर पोलिसांनी तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केले.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023