Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
जिल्ह्यात तहसीलदारांच्या बदल्या; कऱ्हाडला कुऱ्हाडे, खटावला किरण जमदाडेंची नियुक्ती
Aapli Baatmi October 02, 2020

सातारा : राज्यभरात विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तहसीलदार व एका उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश काढले. नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.
खटाव तालुक्याच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांची अतिरिक्त तहसीलदार सांगली, जावळी येथील शरद पाटील यांची अतिरिक्त तहसीलदार इचलकरंजी, कोरेगाव येथील रोहिणी शिंदे यांची महसूल विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे तहसीलदार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी समीर यादव यांची फलटण तहसीलदारपदी, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदारपदावरून अजित कुऱ्हाडे यांच्याकडे कऱ्हाड तालुका तहसीलदारपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बहीण सातारा ग्रामीणच्या उपअधीक्षक
याचबरोबर अमोल कदम यांची भुदरगड येथून कोरेगाव तहसीलदारपदी, विवेक जाधव यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागातील तहसीलदारपदावरून पुनर्वसन विभाग सातारा या ठिकाणी तहसीलदारपदी, रणजित देसाई यांची मिरज तहसीलदार येथून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदापदी, दीप्ती रिठे यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदारपदावरून पुनर्वसन विभाग सातारा येथे तहसीलदारपदी, किरण जमदाडे यांची तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथून खटाव (वडूज) या ठिकाणी तहसीलदार म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची पुणे येथे ई-फेरफार, जमाबंदी आयुक्तालयात राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारीपदी, तर सातारा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदाचा कार्यभार नीता सावंत-शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023