Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
सोलापूर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा प्रभारी पदी शरद लाड, उस्मानाबादच्या प्रभारीपदी प्रशांत बाबर तर साताऱ्यांची जबाबदारी संकल्प डोळस यांच्यावर
Aapli Baatmi October 02, 2020

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा प्रभारीपदी सांगली येथील शरद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका पातळीवर व गाव पातळीवर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची बांधणी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील 43 ठिकाणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने प्रभारी म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आज नवीन जिल्हा प्रभारी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
सोलापूर साठी नियुक्त झालेले शरद लाड हे सांगली जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते आहेत. सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी तब्बल सहा वर्षे काम पाहिले आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रशांत बाबर यांची नियुक्ती उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रभारी पदी करण्यात आली आहे.
माळशिरसमधील राष्ट्रवादीचे युवा नेते संकल्प डोळस यांची नियुक्ती सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रभारी पदी करण्यात आली आहे. नूतन प्रभारी लाड यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेऊन येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये आपण सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहोत.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Lad as district in-charge of Solapur Nationalist Youth Congress, Prashant Babar as in-charge of Osmanabad and Sankalp Dolas as Satara.
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023