Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
अप्पर तहसिलदार कार्यालय सांगलीत लवकरच सुरू होणार : पृथ्वीराज पाटील
Aapli Baatmi October 02, 2020

सांगली- सांगलीत अप्पर तहसिलदार कार्यालय सुरू करण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्या आहेत. या ठिकाणचे अप्पर तहसीलदार पद भरण्यात आले आहे, नायब तहसिलदारांसह इतर पदेही लवकरच भरली जातील, अशी ग्वाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्याचे कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले,””सांगलीच्या अप्पर तहसीलदार कार्यालयातील पदे भरावीत आणि हे कार्यालय लवकर सुरू करावे यासाठी महसूल मंत्री थोरात यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन सादर केले. हे कार्यालय लवकर सुरू व्हावे म्हणून पालकमंत्री जयंत पाटील यांनीही शिफारस करून सहकार्य केले.
राजवाड्यात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे कार्यालय सुरू होईल. सांगली शहर, कुपवाड, सांगलीवाडी, हरिपूर, अंकली, इनाम धामणी, बामणोली, वानलेसवाडी, बुधगाव, माधवनगर, नांद्रे, बिसूर, कावजी खोतवाडी, वाजेगाव, नावरसवाडी तसेच पश्चिम भागातील काही गावे अशा 31 गावांना कार्यालयात सेवा मिळेल. मिरजेला जाणे लांब असल्यामुळे सांगलीत अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावे अशी अनेक वर्षांची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे. अप्पर तहसिलदारपद भरले आहे. नायब तहसिलदार, एक अव्वल कारकून, चार कारकून, वाहन चालक, शिपाई अशी पदे असतील, उर्वरित पदे लवकरच भरू, अशी ग्वाही श्री. थोरात यांनी दिली.”
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023