Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
दारू-जुगारावरील छाप्यात 43 जणांना अटक... आता पोलिस ठाणेस्तरावरही पथक कार्यरत
Aapli Baatmi October 02, 2020

सांगली- जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र पथक कार्यरत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज देखील या पथकांनी दारू व जुगार अड्डयांवर छापे टाकले. जुगार व दारूच्या 42 केसेस करून 43 जणांना अटक केली.
नूतन पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यात धडाकेबाज एंट्री करून अवैध व्यवसायांवर छापासत्र सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची पळताभुई थोडी झाली आहे. अधीक्षक गेडाम यांनी अवैध व्यवसाय मोडीत काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना स्वतंत्र पथके नियुक्त करण्यासाठी सूचना केल्या आहेत. तसेच केवळ गुन्हे अन्वेषणने नव्हेतर पोलिस ठाणे स्तरावर कारवाईसाठी पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात कारवाईसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत कारवाईचा धडाका सुरू आहे.
पोलिस ठाण्यातील पथके आणि गुन्हे अन्वेषणच्या पथकानी दोन दिवसात जुगार अड्डयांवर छापे मारून 14 केसेस केल्या आहेत. त्यामध्ये 18 जणांना अटक करून त्यांच्याकडून रोख 25 हजार 687 आणि जुगार साहित्य, तीन दुचाकी, चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दारूच्या 25 केसेस करून 28 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 34 हजार 564 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या चार-पाच दिवसापासून सुरू असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.
कारवाई सुरूच राहणार-
अवैध व्यवसायिकांविरूद्ध केलेल्या कारवाईचे जनतेतून स्वागत होत आहे. यापुढेही अवैध व्यवसायाविरूद्ध कारवाई सुरूच राहणार असून ते पूर्णपणे मोडीत काढले जातील असा इशारा अधीक्षक गेडाम यांनी दिला आहे.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 43 people arrested in liquor-gambling raid
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023