Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
पिडीत मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, उदगीरात निदर्शने !
Aapli Baatmi October 02, 2020

उदगीर (लातूर) : उत्तरप्रदेश येथील अत्याचार पीडित मुलीला न्याय मिळावा, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शुक्रवारी (ता.२) सर्व विरोधी पक्ष कार्यकर्ते व सामाजिक संघटनांच्या वतीने निदर्शने करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
उत्तर प्रदेश मधील एका मुलीवर अत्याचार करून तिला जिवंत मारले गेल्याची घटना घडली आहे, या घटनेच्या निषेधार्थ अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध विरोधी पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत योगी सरकारचा निषेध करत पीडित मुलीला न्याय देण्याची मागणी केली.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, शहराध्यक्ष मंजूर पठाण, नगरसेवक फैजमोहम्मद पठाण, एमआयएमचे नगरसेवक फय्याज शेख, अहमद सरवर, अमोल घुमाडे, सतीश पाटील मानकीकर, नवनाथ गायकवाड, सुनील केंदे, मुकेश भालेराव, डॉ अंजुम कादरी, नौशाद शेख, आदर्श पिंपरे, सुधीर कांबळे, दीपाली औटे, बबिता भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली. उत्तर प्रदेश सरकारने हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. या घटनेचा निषेध करून मयत मुलीला मेणबत्त्या पेटवून यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करून तीव्र निदर्शने करण्यात आली
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023