Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
उच्चशिक्षित अभियंता चेन स्नॅचर गजाआड
Aapli Baatmi October 03, 2020

इचलकरंजी – शहरात धुमाकूळ घालणाऱ्या उच्चशिक्षित अभियंता चेन स्नॅचरला अखेर इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. आकाश संजय हिंगे (वय 22, पार्वती हौसिंग सोसायटी, ओंकारेश्वर मंदिरजवळ, यड्राव, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. शहापूर येथील मसोबा मंदिर परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून शहरातील तीन चेन स्नॅचरचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या पथकांने संशयित हिंगे याची अंगझडती घेतली. त्यात सोन्याचे मंगळसूत्र आढळले. याबाबत चौकशी केली असता कांही दिवसांपूर्वी राधाकृष्ण चित्रमंदिरच्या मागे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केल्याचे कबूल केले. शहरातील आणखी दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. गद्रे दत्तमंदिर परिसरात तसेच कापड मार्केट ते अपना बझार रोडवर महिलांच्या गळ्यातील दागिणे लंपास केल्याचे निष्पन्न झाले. संशयित हिंगे याला गावभाग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या तपासात सहाय्यक फौजदार खंडेराव कोळी, हवालदार संभाजी भोसले, राजीव शिंदे, शहनाज कनवाडे, रणजीत पाटील, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, रविराज कोळी, संजय इंगवले, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरढोणे, आयुब गडकरी, सुरज चव्हाण, संदीप मळघणे, सेफ सिटी कक्षातील सुजाता पाटील, रुपाली भोये, अरुणा चौगुले यांनी भाग घेतला.
चित्रफितींचा घेतला आधार
संशयित हिंगे हा अभियंता असून लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर चैनीसाठी चेन स्नॅचिंग करण्यात सुरुवात केला. या संदर्भातील चित्रफीती यु ट्यूबवर पाहिल्या. त्यानंतर त्यांने चेन स्नॅचिंग करण्यास सुरुवात केल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
हे पण वाचा – थंड चहानं डोकं केलं गरम; मग झाला एकच राडा
विट्याच्या सराफाला विक्री
चोरीतील दागिने त्यांने विटा येथील सराफाला दिल्याचे कबूल केले. लॉकडाऊनमुळे पैशाची अडचण असून घरातील नातेवाइकांना कोरोना झाल्याचे त्यांने सराफाला खोटे सांगितले. सराफाकडून पोलिसांनी दोन सोन्याचे मंगळसूत्र व चेन असा 56 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत. मोपेड, मोबाईल असा 3 लाख 52 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संपादन – धनाजी सुर्वे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023