Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सांगलीच्या दोन बहिणींच्या पेंटिंगचे झाले कौतुक ; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले आभार
Aapli Baatmi October 03, 2020

देवराष्ट्रे (सांगली) : ‘पोलीस पांडुरंग विटेवर नाही वाटेवर उभा! हे वृत्त दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाले होते. सोनकिरे ता.कडेगाव. येथील निलम पाटील व सुमित्रा पाटील या दोन बहिणींनी पोलिसांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे चित्र साकारले होते. सकाळच्या बातमीची दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटर,इंस्ट्राग्रामवर निलम पाटील व सुमित्रा पाटील यांचे कौतुक केले आहे.
सोनकीरे (ता.कडेगाव) येथील नीलम पाटील व सुमित्रा पाटील या दोन बहिणींनी चित्राच्या माध्यमातून कोविड 19 च्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या कार्याला सलाम केला आहे. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने मी दोन्ही बहिणींचे मनापासून आभार मानतो.असे ट्वीट करत अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.
मास्कचा वापर करा,रस्त्यावर थुंकु नका या नागरिकांच्या , स्वताच्या सुरक्षितेसाठीही पोलिस संदेश देऊ लागले कोरोना कालावधीत कोणाला अन्न नाही अशासाठी पोलिस मदतीला जातात तर रक्तदानासाठी पुढाकार घेताना आपण पाहिले आहे. राज्यातील पोलिसांना कोरोना झाला त्यात अनेक पोलीस बांधवांचा मृत्युही झाला कोरोना विषाणूच्या विचार न करता पोलिसांचे काम अखंडितपणे आज अखेर सुरू आहे. या कामगिरीची अनेक पातळीवर दखल घेतली जात असताना दोन बहीनीसुद्धा एका पेंटिंगच्या माध्यमातून पोलिसांच्या कामाला सलाम केला होता.
सोनकीरे (ता.कडेगाव) येथील नीलम पाटील व सुमित्रा पाटील या दोन बहिणींनी चित्राच्या माध्यमातून #Covid19 च्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या कार्याला सलाम केला आहे. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने मी दोन्ही बहिणींचे मनापासून आभार मानतो. pic.twitter.com/7Ka6yytsgI
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 29, 2020
पाटील बहिणीनी साकारलेल्या या चित्रात पांडुरंगाची मूर्ती साकारली होती त्यामध्ये पोलीस बांधव उभा आहे असे दर्शवले आहे. तो “पांडुरंग आहे आपल्यासाठी विटेवर नाही तर वाटेवर उभा” महाराष्ट्र पोलीस सलाम तुमच्या कर्तुत्वाला,कुटुंब सोडून कशाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी लढणारे तुम्ही तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा, असा पोलिसांना ऊर्जा देणारा संदेश,पोलिस कोरोनाच्या महामारीतील काम व आपल्यासाठी पोलीस व्यवस्था किती महत्वाची भूमिका बजावतात हे या चित्रात साकारले होते.
संपादन – अर्चना बनगे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023