Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
दिलासादायक : उस्मानाबादेत आज कोरोनामुळे मृत्यू नाही, वाढले १५८ पॉझिटिव्ह.
Aapli Baatmi October 03, 2020

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये १५८ नवीन रुग्णांची भर पडली असुन १९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकाही मृत्युची नोंद नसल्याने निश्चितपणाने काहीसा दिलासा देणारी बाब समोर आली आहे. बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के इतके झाले असुन मृत्यू दर ३.१० टक्क्यावर पोहचला आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जिल्ह्यामध्ये आजपर्यंत ६० हजार ७४३ नागरीकांची तपासणी करण्यात आली असुन त्यातुन १२ हजार ४६४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.साधारण २०.५२ टक्के इतक्या प्रमाणात नागरीकांना कोरोनाची लागन झाल्याचे दिसुन येत आहे. जिल्ह्यात सात हजार ८९६ एवढ्या व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर एक हजार १२६ इतके रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जिल्ह्यामध्ये आलेल्या १५८ रुग्णामध्ये १८ जण आरटीपीसीआरद्वारे तर १३१ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यातही उस्मानाबाद तालुक्यामध्ये बाधितांची संख्या पुन्हा वाढल्याचे दिसुन येत आहे. ६९ पैकी ६७ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर दोन जणांना इतर जिल्ह्यामध्ये लागन झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
उमरगा १७ जणांना लागन झाली असुन सहा जण आरटीपीसीआरद्वारे तर दहा जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कळंब मध्ये २० जण बाधित झाले असुन तीन जण आरटीपीसीआरद्वारे व १७ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.वाशीमध्ये १५ जणांना लागन झाली त्यात सात जण आरटीपीसीआरद्वारे तर सात जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. भुममध्ये १४ जणांना लागन झाली असुन त्यामध्ये सर्वजण अँटिजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. परंड्यात ११ जणांना कोरोनाची बाधा झाली असुन त्यामध्ये दोन जण आरटीपीसीआरद्वारे व पाच जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर चार जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत. तुळजापुर चार, लोहारा आठ अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023