Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सांगलीत चार महिन्यात सरासरी 26 टक्के अधिक पाऊस
Aapli Baatmi October 03, 2020

सांगली : यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांगली जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा 26 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पाऊस 514 मिलिमीटर असून, यंदा 649 मिलिमीटर पाऊस झाला. सुरवातीच्या काळात दिलेली ओढ शेवटी मात्र भरून काढली आहे.
यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. मॉन्सूनही वेळेत दाखल झाला. मात्र, यानंतरच्या प्रवासात निसर्ग चक्रीवादळाच्या रूपाने यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यांचा प्रभाव सप्टेंबरपर्यंत राहिला. सुरवातीच्या टप्प्यात मॉन्सूनचा जोर नेहमीसारखा नव्हता. जून, जुलैमध्ये झालेला पाऊस आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाचा विचार केल्यास ऑगस्टमध्ये अधिक पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले, तरी तिसऱ्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने भूजल पातळीत सुधारणा झाल्याचे चित्र आहे.
यंदा जून, जुलैमध्ये मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता. त्यातच घाटमाथ्यावरही पाऊस न झाल्याने बहुतांश धरणे जुलैअखेरपर्यंत कोरडी होती. मात्र, सुरवातीला कमी झालेल्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दमदार हजेरी लावली. चार महिन्यांच्या कालावधीत मध्य महाराष्ट्रात अधिक पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्यात कमी म्हणजेच सरासरीच्या सहा टक्के अधिक पाऊस झाला. सोलापुरात 25 टक्के, कोल्हापूरला 23 टक्के पाऊस पडला. सांगली, कोल्हापूरमध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यातील वारणा धरणात 34.40 टीएमसी पाणीसाठा असून, धरण 100 टक्के भरले आहे. कोयना, दूधगंगा, तुळशी, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी व अलमट्टी धरणेही 100 टक्के भरली आहेत. धोम धरणात 13.27 टीएमसी, कण्हेर धरणात 10.03 टीएमसी पाणीसाठा आहे.
पाऊस असा…
सांगली जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः मिरज- 568.2, तासगाव- 512.1,
कवठेमहांकाळ- 583, वाळवा-इस्लामपूर- 627.4, शिराळा- 1312, कडेगाव- 577.2, पलूस- 484.4, खानापूर-विटा 765.2, आटपाडी- 739, जत- 398.4.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023