Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
राज्यातील साखर निर्यात कोटा वाढविण्याची गरज
Aapli Baatmi October 03, 2020

सोमेश्वरनगर – कोरोनाच्या आपत्तीमुळे ज्या कारखान्यांची साखरनिर्यात खोळंबली आहे, त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. राज्यातील ५१ साखर कारखान्यांना याचा थोडाफार लाभ होणार आहे. कारखान्यांनी या निर्णयाबाबत फारसे समाधान व्यक्त न करता नव्या हंगामाचा निर्यात कोटा जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. तसेच, निर्यात केलेल्या साखरेचे अनुदानही त्वरित मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
केंद्र सरकारने सन २०१९-२० या हंगामासाठी ६० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मार्चनंतर कोरोनाने निर्यातीत अडथळे निर्माण झाले. सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारला देशभरातून ५६ लाख टन साखर निर्यात झाल्याचे आणि आणखी १ लाख टन निर्यातीचे करार झाल्याचे दिसून आले.
पुणेकरांनो, हॉटेलात जेवायला जाताय? मग ‘अशा’ प्रकारची काळजी घ्या!
तीन लाख टनांचे कोटे उरले होते. राज्यातील ५१ साखर कारखान्यांचे जवळपास दीड ते पावणेदोन लाख टन साखर निर्यात होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने डिसेंबरअखेर देशातील ३ लाख टन निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याने अतिरिक्त साखरसाठ्यातही घट होणार आहे.
शरद पवार संतापले; ‘उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, यावर कवडीचा विश्वास राहिला नाही!’
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023