Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
बाळ जन्मले पण आईचा जीव धोक्यात; डॉक्टरांनी वाचवले प्राण
Aapli Baatmi October 03, 2020

बारामती : काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती…असे म्हटले जाते याचा प्रत्यय बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी (ता. 1) आला. या रुग्णालयात प्रसूती सुरु असतानाच एका महिलेला प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला. सुदैवाने बाळ बाहेर आल्यानंतर हा रक्तस्त्राव सुरु झालेला असल्याने बाळ सुरक्षित होते. बारामतीतील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश कोकरे हे त्याच ठिकाणी दुसरी शस्त्रक्रीया करीत होते. ही बाब त्यांच्या कानावर घालताच ते धावतच संबंधित ऑपरेशन थिएटरमध्ये गेले.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तपासणी केल्यानंतर बाळाची वार (वार म्हणजे बाळाची नाळ ज्यातून निर्माण होते त्याला वार संबोधतात) आईच्या गर्भाशयामध्ये घुसली होती व त्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला होता. आईचा रक्तदाबही वेगाने कमी होऊ लागला, त्यांची स्थिती काही क्षणातच बिघडू लागल्यानंतर गर्भाशयाची पिशवी काढल्याशिवाय संबंधित महिलेचा जीव वाचणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ही पिशवी काढण्याचा निर्णय घेतला.
कोरोनामुक्त रुग्णांना उपमुख्यमंत्र्यांचा दिलासा; शहरात सुरू होणार ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सेंटर!
दैवाने भूलतज्ज्ञ डॉ. सुजित अडसूळ, डॉ. बापू भोई, डॉ. शुभांगी वाघमोडे, डॉ. वैशाली जाधव ही टीम तेथे उपस्थित होती. त्यामुळे डॉ. राजेश कोकरे व या सर्व इतर डॉक्टरांनी तातडीने हालचाल करीत संबंधित महिलेची पिशवी काढून टाकली, त्या नंतर महिलेची प्रकृती स्थिर झाली असून आता तिची तब्येत उत्तम आहे.
अवघड शस्त्रक्रिया होती!
लाखात अशी एखादीच घटना होते. गर्भाशयात वार घुसल्याने रक्तस्त्राव अधिक होत होता, तातडीने गर्भाशयाची पिशवी काढणे गरजेचे होते, सुदैवाने सगळे व्यवस्थित घडल्याने एक जीव आम्ही वाचवू शकलो याचा आनंद आहे. माझ्या 22 वर्षांच्या कारकिर्दीतील एक अविस्मरणीय असाच हा क्षण होता.
– डॉ. – राजेश कोकरे, बारामती.
मराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार
टीम वर्क कामी आले
प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याने तिचे ब्लडप्रेशर झपाट्याने कमी होऊ लागले होते. अशा वेळी वेगळ्या प्रकारचे सलाईन देऊन रक्तदाब स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. ऑक्सिजन चालूच होता. तातडीने ब्लड मागविण्यात आले.
सर्जरी, रक्तस्त्राव, सर्जनच्या हालचालींवर लक्ष ठेवणे,सहकाऱ्यांना योग्य त्या सुचना देणं आणि जीव वाचविण्यासाठी जे जे काही करायला लागेल ते ते सर्व करण, हे अत्यंत महत्त्वाचे असते.
– डॉ. सुजित अडसूळ, भूलतज्ज्ञ
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023