Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
चंद्रभागा नदीत बुडून एकाचा मृत्यू; कामावरून घरी आल्यानंतर अंघोळ ठरली शेवटची
Aapli Baatmi October 03, 2020

अचलपूर (जि. अमरावती) : तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथील चंद्रभागा नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज उघडकीस आली. सुभाष विठूजी शेंदरे (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते वडगाव फत्तेपूर येथे राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष शेंदरे यांची चंद्रभागा नदीवरील अंघोळ शेवटची ठरली. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथील सुभाष शेंदरे हे गुरुवारी (ता. १) सायंकाळी पाज वाजताच्या सुमारास कामावरून घरी परत आल्यानंतर नदीवर अंघोळीसाठी गेले. मात्र, घरी परतलेच नाहीत. जसजशी रात्र होत गेली तसतसे शेंदरे कुटुंबाचे हृदयाचे ठोके वाढत होते.
सविस्तर वाचा – अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर
गावामध्ये ओळखीच्या तसेच परिचयातील मित्रांना विचारले. मात्र, त्यांच्याबाबतीत कोणालाच काही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली. मात्र, त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर आज सकाळी गावातील नागरिकांना नदीकाठी कपडे आढळून आले. ही वार्ता गावात पसरली. कपडे सुभाष शेंदरे यांचेच असल्याचे समजल्यावर त्याची माहिती परतवाडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुभाष शेंदरे यांचा शोध लावला. अखेर त्यांचा मृतदेह डोहात अडकल्याचे निदर्शनास आले.
परतवाडा पोलिसांनी तत्काळ सर्पमित्र सईद भोपालीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. सदर घटनेचा तपास ठाणेदार सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलिस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक रीना सदार, हेड कॉन्स्टेबल सुभाष तराळ, भारत कोहळे करीत आहेत.
संपादन – नीलेश डाखोरे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023