Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
उदगीर रुग्णालयात 'ऑक्सिजन टॅंक'; सत्तर लाखांची मंजूरी
Aapli Baatmi October 03, 2020

उदगीर (लातूर): येथील सामान्य रुग्णालयामध्ये भासत असलेला तुटवडा लक्षात घेऊन सत्तर लाख रुपयांच्या स्वतंत्र ऑक्सीजन टॅंक निर्मातीला राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मंजूरी दिली असल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
मागच्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्ण व अन्य रुग्णासाठी ऑक्सिजनचा होत असलेला तुटवडा पाहता व पुढील काळामध्ये उदगीरच्या रूग्णालयात कार्यान्वित होणारे ट्रामा केअर सेंटर, भविष्यात होणारा विस्तार लक्षात घेऊन राज्यमंत्री श्री बनसोडे यांनी उदगीर येथे स्वतंत्र ऑक्सीजन टॅंक निर्माण करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी मंजूर करून घेतला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
यापुढील काळात उदगीर व जळकोट तालुक्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये खाजगी रुग्णालयांना सुद्धा ऑक्सीजन देऊ शकेल एवढा ऑक्सिजन निर्मितीचा टँक आता उदगीर येथे निर्माण होणार आहे त्यासाठी 70 लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर करून त्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दिवसेंदिवस उदगीर व जळकोट परिसरामध्ये वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने ऑक्सिजनचा येथील रुग्णालयांना तुटवडा भासत होता. मात्र ही परिस्थिती गंभीर होऊ नये व ऑक्सिजन अभावी कुठल्याच रुग्णाचा मृत्यू होऊ नये यादृष्टीने येथील आरोग्य विभागाने शासनाकडे स्वतंत्र ऑक्सीजन निर्मिती टॅंकचा प्रस्ताव सादर केला होता. राज्यमंत्री बनसोडे यांच्या प्रयत्नामुळे 70 लाख रुपयांच्या या प्रस्तावास आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून या निधीची तरतूद केली असल्याचे यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023