Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
घरी आलोच राहूलने फोनवरुन कळविले, अन् क्षणातच काळाने घाला घातला !
Aapli Baatmi October 03, 2020

जरंडी (औरंगाबाद) : भरधाव वाहनाने समोरून येणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजता सोयगाव-बनोटी रस्त्यावर जरंडीजवळ घडली.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोयगावकडून बहुलखेडा गावाकडे मोटारसायकलवरून (एमएच-२०, के-२३३४) जाणाऱ्या तरुणाला अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. राहुल छगन जाधव (वय २३) असे मृताचे नाव आहे. बहुलखेडाकडे जात असताना जरंडी जवळ हा अपघात झाला. याप्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
तरुणाचा मृतदेह तासभर रस्त्यावर अंधारातच पडून होता. मृतदेहाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नव्हत्या. ऐनवेळी आलेल्या १०८ च्या रुग्णवाहिकेला मृतदेह घेऊन जाण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आल्याने अखेरीस जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ रुग्णवाहिका घटनास्थळी पोलिसांनी पाचारण केली. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्यासह पथक घटनास्थळी पोचले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
घटनास्थळी जरंडी, निंबायती आणि बहुलखेडा या दोन्ही गावांच्या नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने सोयगाव-बनोटी रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. अखेरीस पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून रस्ता मोकळा करून दिला. रात्री शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ, उपनिरीक्षक युवराज शिंदे, जमादार संतोष पाईकराव, दिलीप तडवी, विकास लोखंडे आदी करत आहे.
दोन मिनिटांपूर्वीच तो कुटुंबीयांशी बोलला होता
अपघातात ठार झालेला तरुण राहुल जाधव हा अपघात होण्याच्या दोन मिनिटे आधीच जरंडी गावाजवळ असल्याचे सांगून मोबाईलवरून बोलला असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर काही क्षणातच काळाने त्याच्यावर घाला घातला.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023