Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप
Aapli Baatmi October 03, 2020

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : २०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला होता. घरगुती वापरातील वीज ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करणार असल्याचे शिवसेनेच्या वचननाम्यात होते. प्रत्यक्षात सदर वचन पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची फसवणूक केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात अमरावती शहरातील विविध ठाण्यांसह चांदूररेल्वेत आम आदमी पार्टीने पोलिसांत तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील वीज ग्राहकांना (जनतेला) काही वचन दिले होते. त्यामध्ये प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असे वचन होते.
या अत्यंत महत्त्वाच्या आश्वासनांचा प्रचार त्यांनी व्हिडिओ, पत्रके, भाषणे, ट्विटर अशा विविध माध्यमातून केला होता. त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या ५६ उमेदवारांना निवडून दिले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेला दिलेली वचन पाळणे त्यांची राजकीय आणि नैतिक जवाबदारी होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केलेली आहे. या उलट देशात आणि राज्यात महामारीचे संकट असताना एक एप्रिल २०२० पासून वीजदरवाढ करून राज्यातील जनतेला फसवले आहे. तसेच तीन रुपये प्रती युनिटप्रमाणे तयार होणारी वीज १५ रुपयांप्रमाणे देऊन जनतेची लूट चालू आहे, असे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.
आप नेते नितीन गवळी यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री तथा न. प.चे माजी उपाध्यक्ष नितीन गवळी, गौतम जवंजाळ, विनोद लहाने (पाटील), चरण जोल्हे, नीलेश कापसे, गोपाल मुरायते, हरिभाऊ जुनघरे, सागर गावंडे आदींची उपस्थिती होती.
जाणून घ्या – ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्तीचा अध्यादेश रद्द
गुन्हा दाखल करण्याची मागणी
ज्याअर्थी सरकारपक्ष असलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पाठपुरावा करूनही पाळत नाही, त्याअर्थी ही जनतेची जाणीवपूर्वक केलेली फसवणूक आहे. त्यामुळे चांदूररेल्वे पोलिसांत लेखी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमरावती शहरातील विविध ठाण्यांसह चांदूररेल्वे येथेही तक्रार देण्यात आली.
संपादन – नीलेश डाखोरे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023