Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
कोरेगावात सायगावच्या एकाचा खून, एक गंभीर
Aapli Baatmi October 04, 2020

कोरेगाव (जि. सातारा) : येथील दौलत चित्र मंदिराच्या व्हरांड्यात एक जण मृतावस्थेत, तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला आहे. दोघेही सायगाव (ता. कोरेगाव) येथील असून, घटनास्थळी दारूच्या बाटलीसह लाकडी दांडके पडल्याचे दिसून येत आहे. मृताच्या डोक्यातील गंभीर जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून, त्याचा खून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृत व जखमी या दोघांनाही नेमकी कशी मारहाण झाली? या दोघांव्यतिरिक्त त्या ठिकाणी आणखी कोणी होते का? याबाबतची माहिती घेण्याचे पोलिसांचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सुनील नंदकुमार घोरपडे (वय अंदाजे 48, रा. सायगाव, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव असून, त्याच गावातील आनंदा बाळा जाधव हे गंभीर जखमी आहेत. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही माहिती समजताच सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनील यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. गंभीर जखमी असलेले आनंदा जाधव यांना उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
कऱ्हाडकरांना आता रोज मिळणार जादा तीन लाख लिटर पाणी
दरम्यान, दोघेही सायगाव येथील असल्याचे समजताच पोलिसांनी दोघांच्याही नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेविषयी माहिती दिली. घटनास्थळी दारूच्या बाटलीसह लाकडी दांडके पडल्याचे दिसून येत आहे. नंदकुमार व आनंदा या दोघांव्यतिरिक्त त्या ठिकाणी आणखी कोणी होते का? कोणी कोणाला मारहाण केली? याबाबतची माहिती घेण्याचे पोलिसांचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे शाखेचे पथकदेखील दाखल झाले.
कोरेगाव पोलिसांचा फार्म हाऊसवर छापा; पनवेलचे चार अटकेत
Edited By : Siddharth Latkar
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023